
राजापूर | डिसेंबर ३१, २०२३.
“राजापूर तालुक्यातील मुस्लीमबहुल क्षेत्र विकासाच्या बाबतीत अद्याप मागे आहे. याला स्थानिक कारणांसोबतच राजकीय अनास्था कारणीभूत आहे. मात्र भाजपा नेते प्रमोद जठार यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्यक्ष विकास चालत येत असल्याचा आभास होत आहे.” अशा बोलक्या प्रतिक्रिया राजापूर विधानसभा प्रवासाच्या निमित्ताने ऐकायला मिळाल्या. “एक माजी आमदार एकाच दिवशी स्वकष्टाने आणलेल्या १०-१० विकासकामांची भूमीपूजने करत असेल, लोकांच्या समस्या बसल्या बैठकीत सोडवत असेल तर अशा उदारमतवादी नेतृत्त्वाला सरकारकडे विकासकामांची मागणी करण्यासाठी पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या सरकारचा हिस्सा म्हणून पाठवणे संयुक्तिक ठरेल.” अशाप्रकारे साखरी नाटे येथील मुस्लिम समुदायाने मनोगत व्यक्त केले.
“मागील १०-१५ वर्षे सातत्याने उपेक्षा झाल्यानंतरही आम्ही कोण्या एका पक्षाच्या जोखडातून मुक्त होऊन आमच्या विकासाबाबत बोलणार नसू तर आमच्या पुढील पिढ्यांसमोर काय आदर्श ठेवणार. भाजपा हिंदुत्ववादी पक्ष असला तरी राष्ट्रयोगी पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदीजींनी कल्याणकारी योजनांचा लाभ देताना कोणताही धार्मिक भेद केला नाही. महाभारतातील धर्मराजाप्रमाणे प्रधानसेवक बनून राष्ट्राची आराधना करणाऱ्या या महापुरुषाला मतदान करण्याची संधी मिळणे ही मुस्लिम समाजासाठी गौरवास्पद बाब आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मोदीजींच्या घोषणेला आता मुस्लिम समुदाय ‘हमारी साथ, हमारा विकास, हमारा विश्वास, हमारा प्रयास’ म्हणत सहयोग देईल.” असे श्री. अमजद बोरकर म्हणाले.
यासाठी कोणत्याही धार्मिक दबावाला बळी न पडता भाजपा जो लोकसभेसाठी उमेदवार देईल त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन राजापुरात ठीकठिकाणच्या मुस्लिम समुदायाने दिले. “प्रमोद जठार भाजपाचे अतिशय मेहनती आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मुस्लिम समुदायाला त्यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यामुळे या लोकसभेसाठी जठार साहेब उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्या प्रचारात आघाडीवर राहू.” असेही अनेकांनी सांगितले. सागवे येथील श्री. दाऊदभाई काझी यांनी आपल्या शायरीमधून श्री. प्रमोद जठार यांचे कौतुक केले. “खिला दामन का पैगाम है प्रमोद जठार…, काबिलेदार तेरा काम है प्रमोद जठार…, दिल की गहराई से करता हूँ पेश मुबारक बात…, काझी अल्ला का करम है प्रमोद जठार!”
मौजे कोतापूर येथे सन्माननीय मा. आमदार तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. @Pramod Jathar यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी भाजपा राजापूर (पू.) च्या तालुकाध्यक्षा सौ. सुयोगाताई जठार त्यांच्यासोबत होत्या.
तालुकाध्यक्ष श्री. सुरेश गुरव, जिल्हा सरचिटणीस श्री. रवीदादा नागरेकर आणि अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते, लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा