
नेरळ: सुमित क्षीरसागर- प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होत असून देशात श्रीराम अक्षदा कलश शोभा यात्रा काढण्यात येत आहेत.नेरळ येथे समस्त हिंदू यांनी एकत्र येवून शोभा यात्रा काढली,या यात्रेत नेरळ मधील सर्व जाती धर्माचे लोक,व्यापारी वर्ग,विद्यार्थी यांचा सहभाग होता.


श्री अयोध्या धाम येथून पूजेत अक्षदा कलश नेरळ येथे आला होता. श्री अयोध्या धाम येथून आलेल्या अक्षदा कलशाचे स्वागत करण्यासाठी नेरळ येथे शोभा यात्रा काढण्यात आली. भव्य अक्षता कलर शोभायात्रा नेरळ येथील श्री गणेश मंदिर हेटकर आळी येथून ढोल ताशा आणि लेझिम यांच्या साथीने निघाली.येथे आयोजित करण्यात आली होती.असंख्य नेरळ कर यांचा सहभाग असलेली ही शोभा यात्रा माथेरान नेरळ रस्त्याने लोकमान्य टिळक चौकातुन हुतात्मा हिराजी पाटील चौक अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली.तेथून स्टेशन रस्त्याने हुतात्मा भाई कोतवाल चौक अशी टॅक्सी स्टँड वरून खांडा मैदान अशी खांडा गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे पोहचली.तेथे आरती घेवून ही शोभा यात्रा पुन्हा माथेरान रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जुन्या बाजारपेठ मधून श्री राम मंदिर येथे विसर्जित करण्यात आली.

या शोभा यात्रेत नेरळ गावातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या,तर विद्या विकास मंदिर आणि जेनी तुलीप शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.दरम्यान,एक ते 15 जानेवारी दरम्यान श्रीराम कलश अक्षदा गृह संपर्क अभियान नेरळ गावातील घरोघरी पोहचवले जाणार आहे.