नव वर्षाच्या पूर्वसंध्येस आयेजित रेव पार्टीवर गुन्हे शाखा, ठाणे यांची छापा कारवाई

Spread the love

ठाणे : निलेश घाग नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पाटर्यामध्ये अंमली पदार्थाचा विकी व सेवन चालत असते. त्याकरीता अशा पाटर्यावरती नजर ठेवुन कडक कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी निर्देश दिले होते. गुन्हे शाखेस गोपनीय रित्या बातमी मिळाली की, दिनांक ३०/१२/२०२३ मध्यरात्री वडवली खाडी किनारी एका निरजन स्थळी दोन इसमांनी नवयुवकांकरीता अंमली पदार्थाच्या विकीसह रेव पार्टीचे आयोजन केले आहे. त्यावरून मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त शोध- १, यांचे नेतृत्वाखाली घटक-५ व घटक २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आज दि. ३१/१२/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वाजता वडवली खाडी किनारी एक रेव पार्टी चालु असताना छापा कारवाई केली.

सदर ठिकाणी ९० पुरूष व ५ महिला, या अंमली पदार्थाचे सेवन करून मदयधुंद अवस्थेत डिजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना मिळुन आले. सदर इव्हेंटचे आयोजन करणा-या दोन इसमांना ताब्यात घेवुन त्या दोघांच्या ताब्यात एकुण रूपये ८,०३,५६०/- किंमतीचा चरस ७० ग्रॅम, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर/वाईन/व्हिस्की, असा अंमली पदार्थ व मद्य विकीकरता बाळगले असताना मिळुन आला आहे. तसेच घटनास्थळावरून गांजा पिण्याचे साहित्य साधने, डीजे मशिन, २९ मोटार सायकली इ. साहित्य मिळुन आले. त्याबाबत एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे श्री निलेश सोनावणे साो, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके, सहा पोलीस निरीक्षक श्री. भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पोउपनि तुषार माने, पोहवा/सुनिल निकम, पोहवा/विजय काटकर, पोहवा/रोहीदास रावते, पोहवा / जगदीश न्हावळदे, पोहवा / सुशांत पालांडे, पोहवा/विजय साबळे, मपोहवा/मिनाक्षी मोहीते, पोहवा/माधव वाघचौरे, पोहवा/सुनील रावते, पोना/तेजस ठाणेकर, पोना/रघुनाथ गार्डे, पोना/उत्तम शेळके, पोशि/यश यादव यांनी तसेच गुन्हे शाखा घटक २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचीन गायकवाड, सपोनि/सचीन ढोके, पोहवा/राजेंद्र राठोड, पोहवा / रविंद्र साळुंखे, पोहवा/जितेंद्र भोईर, मपोहवा/माया डोंगरे, मपोहवा/श्रेया खताळ, पोशि/जालीदर साळुंखे पोशि/ ठाकुर या पथकाने कारवाई केली आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page