राज्यात येत्या २४ तासात थंडीच्या लाटेचा इशारा; राज्यातील बहुतांश जिल्हे गारठले; राज्याला हुडहुडी भरली…

Spread the love

मुंबई- राज्यात थंडीची लाट आली आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता आणखी कमी होणार असून त्यात पुढील २४ तासांत तापमानात आणखी घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव शहरात देखील तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक गारठले असून थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेतांना नागरिक दिसू लागले आहेत. तापमानात चांगलीच घट झाल्याने नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहीनुसार २७ पुण्यात नोव्हेंबर रोजी रात्रीचे तापमान ९.९ अंश सेल्सिअस होते. या वर्षीचे हे पहिलेच एक अंकी किमान तापमान होते. अधिकृत माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता कमी होणार असून थंडी आणखी वाढणार आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे काही राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या भागाला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील थंडी वाढली आहे. मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये व पुण्यात गेल्या काही वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद बुधवारी झाली आली. हवेत गारवा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, लोणावळा, शिरुर, भागात तापमान 10 अंशांवर आले होते. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे गावोगावी शेकोटी पेटण्यास सुरुवात झाली आहे. तर राज्यातील नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये शीत लहरींचा धोका असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. थंडीपासून बचावासाठी आवश्यक कपडे परिधान करावी लागतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page