मुंबई मेट्रो 3 पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, मोदींनी मानले जपान सरकारचे आभार…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे लोकार्पण झाले. मा मेट्रो मार्ग रविवार पासून सर्वसामान्य लोकांसाठी खुला होत आहे. यामुळे प्रवासाचा बराचसा वेळ वाचणार असून ट्राफिक पासून देखील लोकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जपान सरकारचे देखील आभार मानले.

मुंबई मेट्रो 3 पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, मोदींनी मानले जपान सरकारचे आभार…

मुंबई /प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आज एक मोठी आंनदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ही केवळ मराठी, महाराष्ट्राचा सन्मान आहे असा नाही. हा त्या पंरपरेचा सन्मान आहे ज्यांनी देशाला अध्यात्मा, ज्ञान आणि साहित्य ही देणगी दिली आहे. नवरात्रीत मला एक मागे एक अनेक विकासकामांचं लोकार्पण करण्याचं सौभाग्य मिळत नाही. वाशिममध्ये मी देशातील ९.५ कोटी शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी जारी केला. ठाण्यात महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचा किर्तिमानाचे काम सुरु होत आहे. महाराष्ट्रा्च्या विकासाही ही सुपरस्पीड आहे.

‘महायुती सरकारने मुंबई ३० हजार कोटीपेक्षा अधिकचं प्रोजेक्ट सुरु केले आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट, नैना प्रोजेक्ट, इस्टर्न फ्री वे, ठाणे महापालिकेचे नवे मुख्यालय याचं उद्घाटन आज होत आहे. हे विकासकार्य मुंबई आणि ठाण्याला आधुनिक ओळख देतील. मेट्रोची सुरुवात ही आज होत आहे. मुंबईच्या लोकांना अधिक महिन्यांपासून याची वाट पाहत होते. जपान सरकारचे ही मी आभार व्यक्त करतो. त्यांनी या कामात खुप मदत केली आहे. ही मेट्र्रो भारत -जपान मैत्रीचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्याशी वेगळं नातं होतं. विकसित भारत हे आमचं एकच लक्ष्य आहे. आमच्या सरकारचं प्रत्येक काम विकसित भारतसाठी समर्पित आहे.’

‘आम्हाला विकास ही करायचं आहे आणि काँग्रेसच्या खड्ड्यांना ही भरायचे आहे. काँग्रेस आणि त्यांचं सहयोगी पक्ष ठाण्याला कुठे घेऊन जात होते. ठाण्यात लोकसंख्या वाढत होती, ट्राफीक वाढत होती पण समाधान काहीच नव्हतं. आमच्या सरकारने या स्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला. आज मुंबईत ३०० किमीचे मेट्रो नेटवर्क तयार होत आहे. अटल सेतून मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी केले आहे. अनेक असे प्रोजेक्ट आहेत. या प्रकल्पांचा फायदा मुंबईला होईल.’

‘आज एकीकडे महायुती सरकार आहे जी महाराष्ट्राचा विकासालाच लक्ष्य मानत आहे. दुसरीकडे महाआघाडी आहे त्यांना जेव्हा संधी मिळते ते ही काम बंद करतात. कामांना अडकवण्याचं कामच यांना येतं. मुंबई मेट्रो याचा साक्षीदार आहे. मेट्रो लाईन ३ ची सुरुवात फडणवीस यांच्या कार्यकाळात झाले. पण नंतर महाविकासाआघाडी सरकारने अंहकारामुळे मेट्रोचे काम लटकवलं. अडीच वर्ष काम लटकल्याने १४ हजार कोटींने खर्च वाढला. हा कोणाचा पैसा होता. हा नागरिकांचा पैसा होता. टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या मेहनतीचा पैसा होता. महाविकासविरोधी हे लोकं आहेत. अटल सेतुला देखील यांनी विरोध केला. बुलेट ट्रेन बंद करण्याचा प्रयत्न केला. बुलेट ट्रेनचं काम थांबवलं. पाण्याचे प्रकल्प यांनी बंद केले. ज्यांनी लोकांची तहान भागवली जाणार होती. ती कामे यांनी थांबवली.

‘आता तुम्हाला यांना रोखायचे आहे. यांना सत्तेपासून लांब ठेवा. काँग्रेस भारताची सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे. कोणत्याही राज्यात काँग्रेसचं चरित्र नाही बदलत. मागच्या एका आठवड्यात काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचं जमीन घोटाळ्यात नाव समोर आले आहे. त्यांचे मंत्री महिलांना शिव्या देत आहेत. मोठ्या मोठ्या घोषणा करतात आणि सरकार आल्यावर जनतेचं शोषण करतात. नवीन नवीन टॅक्स लावून घोटाळ्यासाठी पैसा जमवतात. हिमाचलमध्ये त्यांनी एक टॅक्स लावला आहे. टॉयलेट टॅक्स. एकीकडे मोदी म्हणतोय टॉयलेट बनवा आणि हे त्यावर टॅक्स लावत आहेत.’

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page