
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्जत येथे महाआरोग्य शिबीर संपन्न
कर्जत: सुमित क्षीरसागर- नागरिकांना त्यांच्या आरोग्याप्रती सजग राहण्याची शिकवण दिली. तर आताच काळ हा धावपळीचा असल्याने त्यात अनेकांना रोज स्वतःसाठी वेळ काढणे जमत नाही. तर बदलती जीवनशैली हि आरोग्याच्या अनेक समस्यांना कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे आपल्याला समजायला देखील कठीण असे आजार डोके वर काढत आहेत. तर कर्जत येथील भाग ग्रामीण असल्याने या भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी सतर्क ठेवण्यासाठी अशी आरोग्य शिबिरे गरजेची असून येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हे पुढाकार घेत असल्याचे चित्र खरंच आशादायी असल्याचे कौतुगोद्गार पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी कर्जत येथे काढले. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्जत येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी डॉ.लहाने हे बोलत होते.


शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची दिनांक २३ जानेवारी रोजी जयंती आहे या जयंती निमित्त आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २१ जानेवारी रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन शिवतीर्थ सभागृह, पोसरी येथे करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे ,पद्मश्री डॉ तात्याराव लहाने ,किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.प्रसाद थोरवे व नगरसेवक संकेत भासे यांनी महाआरोग्य शिबीरात विशेष मेहनत घेतली.
यावेळी लाभार्थ्यांना व्हीलचेर ,शिलाई मशीनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या शिबीरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदी शास्क्रिया ई.सी.जी. ,बी.पी.आणि शुगर तपासणी , सामान्य तपासणी, हाडांचे आजार, पाठदुखी, मानदुखी, हात आणि पायाच्या मुंग्या, कॅन्सर , स्त्रीरोग,दंत चिकित्सा, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मधुमेह आदींवर मोफत उपचार करण्यात आले.तसेच चष्मा, सॅनिटरी पॅड्स, औषधे यांचे मोफत वाटप देखील पार पडले.या शिबिरासाठी २ हजारपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरासाठी गर्दी केली होती.