मीरा भाईंदर पोलिसांचा दंगलखोरांना इशारा, गैरकृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही…

Spread the love

मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी गैरकृत्य करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. या घटनेनंतर महापालिकेने काल तोडक कारवाई केली होती. अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला होता. त्यानंतर या कारवाईचे स्वागत करण्यात आले होते.

मीरा-भाईंदर : 21 जानेवारी रोजी रात्री मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडच्या नया नगरमध्ये काही गांड्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर नया नगर परिसरातील वातावरण बिघडले होते. सध्या या नया नगर भागातील वातावरण सुरळीत आहे. मिरा, भाईंदर, वसई, विरार अतिरिक्त आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले की या प्रकरणी आतापर्यंत 10 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, आणि एकूण 19 जणांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या घटनेत 14 जणांना अटक करण्यात आली होती.

गुन्हे कायद्यांतर्गत 8 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आयटी कायद्यांतर्गत 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, सीसीटीव्हीच्या मदतीने लोकांची ओळख पटवून कारवाई केली जात आहे.

नयानगर दगडफेकीच्या प्रकरणात अद्याप कोणतेही नियोजन समोर आलेले नाही, मात्र त्या कोनातूनही तपास सुरू आहे. बंदुकीसह व्हिडिओ व्हायरल झाला, ते प्लास्टिकचे खेळणे होते. गैरकृत्य करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे देखील त्यांना म्हटले आहे.

शहरात शांतता राखावी, सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणताही वादग्रस्त व्हिडिओ मेसेज व्हायरल करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मीरा रोडमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेष दलाला पाचारण करण्यात आले आहे. नयानगरमधील बेकायदा बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोडच्या नया नगर भागात एकूण 450 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

मीरा रोडमध्ये महापालिकेने मंगळवारी ‘बेकायदा’ बांधकामांवर बुलडोझर चालवला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी दोन गट एकमेकांवर दगडफेक करत असल्याचे दिसत होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे पर्यंत पोलिसांच्या संपर्कात होते. यावेळी त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचा आदेश दिले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले होते की, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही”.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page