
ठाणे – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था आणि जाणता राजा मित्र मंडळ अध्यक्ष श्री समीर नारायण चव्हाण यांच्यावतीने सन्माननीय राज्यमंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचा कोकणातील मुख्य फळ “हापूस आंबा” भेट देवून दिवा शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आहेत.त्यामुळे यावेळी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक बांधव उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयच उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी दिवा शहरातील कोकण वाशियांच्या हक्काची अशी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था आणि जाणता राजा मित्र मंडळ तर्फे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच पुष्प हार, तसेच आपल्या कोकणची शान हापूस आंबा देऊन भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आले. सदैव कोकण वशियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितलं.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर, जाणता राजा मित्र मंडळ अध्यक्ष श्री समीर चव्हाण नितीन कोरगांवकर, रवि मुणनकर, संदेश सावंत, विठ्ठल गावडे, अनंत पडेलकर, लवु गुरव, किरण कोरगांवकर, सचिन गोस्वावी, महेश गावडे, विनोद घाडी, विवेक परब, सुदेश जाधव, विनायक पाचांळ,अनिल गावकर, प्रसाद धुरी,नंदकिशोर धुरी,सदानंद घाडी,दय सावंत,राजेंद्र आंब्रे,अनिल लाड, विकास साळगांवकर,गणेश नेवगे, विघ्नेश, सिध्देश परब, संतोष मेस्त्री,उदय सावंत,प्रियेश जाधव, अरविंद ढेकळे,सुशांत आर्धापुरे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.