कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान १२ रोजी मेगाब्लॉक…

Spread the love

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १२ जानेवारी रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

येत्या १२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस १२ जानेवारी रोजी मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान पावणेदोन तास थांबवण्यात येणार आहे. २०९२३ क्रमांकाची तिरुनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेस ११ जानेवारी रोजी मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे रोखण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page