
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळाने चिपळूणवासियांच्या सहकार्याने प्लास्टिक मुक्ती जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. २१ किलोमीटर पुरुष गटात मुकेश चौधरी, तर महिला गटात साक्षी जड्याळ विजेते ठरले. रोख रक्कम, चषक देऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रविवारी सकाळी ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष गटात मुकेश चौधरी यांनी प्रथम, सिद्धेश वारजे, द्वितीय तर दिव्यांशू कुमार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. २१ किलोमीटर महिला गटात साक्षी जड्याळ, प्रथम अर्चना जाधव, द्वितीय फुलन पाल हिने तृतीय क्रमांक पटकाविला. २१ किलोमीटर ३१ ते ४० वयोगटात पुरुष गटामध्ये कमल सिंग, अनंत गोवेकर, अनिल कोरवी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात सोनिया प्रामाणिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर ४१ ते ५० पुरुष गटात परशुराम लक्ष्मण भोई, मनजित सिंग, अनंत गणपत टानकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात सीमा वर्मा, स्मिता सचिन शिंदे, अंजली तिवारी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
५१ ते ६० पुरुष गटात अनिल टोकरे, रवींद्र जगदाळे, रणजित शिवाजी कनबरकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात ज्योती खणीकर, संगीता ठोकळे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर ६१ वर्षावरील वयोगटात पांडुरंग चौगुले, महिपाल सिंग, विश्वनाथ शेट्ये यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. २१ किलोमीटर ६१ वयोगटावरील महिला गटात लता अलीमंचनंदानी, सुलता कामत यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. दहा किलोमीटर खुल्या गटात सतीश कासले, सुरज कदम, ओंकार चांदिवडे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात प्रमिला पाटील, वंदना मौर्य, प्रतिमा पाल यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. दहा किलोमीटर ३१ ते ४० पुरुष गटात शशी दिवाकर, राजा पिरंगणवार, संदीप पवार यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात विजया खाडे, सुरभी शर्मा, रेखा कोचले यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
दहा किलोमीटर ४१ ते ५० पुरुष गटात सुनिल शिवने, राजेश कोंजार, योगेश जाधव यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले, तर महिला गटात अनिता पाटील, अलका पाटील, प्रतिभा नाडकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. दहा किलोमीटर ५१ ते ६० वयोगटात पांडुरंग पाटील, विठ्ठल आरगाडे, बाळकृष्णन टी. यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात बी. एच. विद्या, नॅन्सी पिंटो, सनिता संजय कदम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले, तर ६१ वयोगटावरील पुरुष गटात संजय पाटील, उदय महाजन, राजेंद्र महाजन यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात पी. सी. पार्वथी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
पाच किलोमीटर खुल्या गटात ओंकार बैकर, दीपेश जाधव, आदित्य धुळप यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, तर महिला गटात श्रुती दुर्गावळी, युगंधरा मांडवकर, दीप्ती आंब्रे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर ३१ ते ४० वयोगटात उमेश खेडेकर, प्रसाद दळी, विकास चांदे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर ३१ ते ४० वयोगटात गौरी आलेकर, रोहिणी सूर्यवंशी, श्रीरस्त नामदेव यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर ४१ ते ५० पुरुष गटात शुभांगी बुरटे, अहमद अली शेख, शंकर कदम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, तर ४१ ते ५० महिला गटात कल्पना हरेकर, वर्षा खानविलकर, कविता परुळेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर ५१ ते ६० पुरुष वयोगटात डॉ. सुनिल निकम, ज्ञानेश्वर पवार, शंकर सातपुते यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात सायली निकम, सुष्मिता विखारे, ज्योती परांजपे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
६१ वयोगटावरील पुरुष गटात दीपक आलेकर, संजय शिंदे, मिलिंद मुद्राळे यांनी प्रथम तीन क्रमांक, तर ६१ वयोगटापुढील महिला गटात उमा आलेकर, शालन रानडे, नूतन देवधर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
पाच किलोमीटर शालेय गटात रोहित राठोड, दिवेश शिंदे, रोहन राठोड यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात हुमेरा सय्यद, अनुजा पवार, कस्तुरी भनशे यांनी अनुक्रमे ३ क्रमांक पटकावले. शालेय गटातील १४ ते १६ वयोगटात रोहन राठोड, प्रतीक देवरे, सोमदेव दिलीप यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक, तर महिला गटात हुमेरा सय्यद, अनुजा पवार, कस्तुरी भनशे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर १६ ते १८ वयोगटात रोहित राठोड, दिवेश शिंदे, साहिल चिनकटे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. १६ ते १८ महिला गटात अनुश्री आमकर, अदिबा तंबू, शितल खळे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
बक्षीस वितरण समारंभाला अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे, मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, आयर्न मॅन डॉ. तेजानंद गणपते, राजू भागवत, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे नियमक समितीचे चेअरमन बाबू तांबे, मंडळाचे आधारस्तंभ भाऊ काटदरे, बाळा कदम, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिनेत्री ऐश्वर्या नागेश हिने केले.