ठाणे पोलीस दलात मोठे बदल; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Spread the love

ठाणे: निलेश घाग ठाणे पोलीस दलात सर्वात जुन्या पोलीस ठाण्यांपैकी नौपाडा पोलीस Thane आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत नौपाडा, गोखले रोड, राम मारूती रोड, पाचपाखाडी यासह महत्त्वाचा व्यापारी आणि जुन्या ठाण्यातील वस्तीचा भाग येतो. शीळ -डायघर भागात मोठ्याप्रमाणात गोदामे आणि कारखाने आहेत. चीतळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंत विहार, टिकूजीनी वाडी यांसारख्या उच्चभ्रू वस्तीचा सामावेश होतो. त्यामुळे हे तीनही पोलीस ठाण्यांना शहर पोलीस दलातील महत्त्वाची पोलीस ठाणे मानले जाते. सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.

नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर त्यांच्या रिक्त जागी शहर वाहतूक शाखेचे रविंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्र क्षीरसागर यांनी काही वर्ष नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले होते. शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर अतिक्रमण विभागाचे संदिपान शिंदे यांची शिळ-डायघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. 

चितळसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांची शहर वाहतुक शाखेत बदली झाली. तर वागळे इस्टेट वाहतुक शाखेच्या चेतना चौधरी यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागात बदली झाली आहे. येत्या दोन दिवसांत आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page