Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार…

Spread the love

Maharashtra Police Bharti 2024 :

पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तब्बल १७,४७१ जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Maharashtra Police Bharti 2024 : राज्यातील रखडलेल्या पोलिस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल १७,४७१ जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पोलिस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधि आहे. त्यामुळे आता तयारीला लागावे लागणार आहे.

राज्य सरकारने १०० टक्के पोलिस भरती करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा मार्ग हा मोकळा झळ आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त ५० करता येत होती. असे असले तरी सरकारने पोलीस खात्यात १०० टक्के पदभरतीला मंजूरी दिली आहे. या मेगा भरतीत पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती केली जाणार आहे.

राज्यात सध्या पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे याचा ताण हा पोलिस यंत्रणेवर येत होता. अनेक प्रकरणे यामुळे प्रलंबित राहत होती. तसेच कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाला नवा आकृतीबंध तयार करण्यास सांगितले होते. राज्यातील रिक्त जागांचा आढावा घेऊन आणि मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page