महाराष्ट्राचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर,अर्थमंत्री देंवेद्र फडणवीसांनी केल्या या मोठ्या घोषणा!

Spread the love

महाराष्ट्र अर्थसंकल्प अपडेट -२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

  • आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज सं कल्पना उद्यान: 50 कोटी
  • मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
  • शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

अमृत काळातील महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प
• छत्रपती शिवाजी महाराज- शिवराजा संकल्पना. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करणार. त्यासाठी उद्यानांमध्ये व्यवस्था. यासाठी २५० कोटींचा निधी.
• शिवनेरी जीवनचरित्रावर अधारीत संग्रहालय. ३५० कोटींची तरतूद.
• भारत विकसित राष्ट्र व्हावे ही संकल्पना. १ ट्रीलीयन डॉलर्सचा महाराष्ट्राचा वाटा. आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापाना. मित्र ही संस्था स्थापन.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

  • महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी
  • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
  • प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान
  • राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
  • पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
  • तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
  • एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
  • 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
  • आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
  • ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
  • अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

  • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
  • 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
  • 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
  • डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
  • 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी.

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

  • 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
  • काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
  • उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
  • कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
  • 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार

  • आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
  • 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
  • सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार
विकास महामंडळाची स्थापना करणार,
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार

  • धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
  • 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
  • महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
  • 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
  • अहमदनगर येथे मुख्यालय असणार
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page