
दिवा : प्रतिनिधी अयोध्या येथील श्री राम मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे दातिवली शाखा आयोजित दातिवली रेल्वे फाटक शाखेसमोर भव्य महाआरती व भजनाचे कार्यक्रम शेकडो दिवेकारांच्या उपस्थितीत पार पडले. प्रसंगी विधानसभा संघटिका सौ योगिता हेमंत नाईक यांच्या उपस्थितीत व मुंब्रादेवी कॉलनी विभाग प्रमुख श्री हेमंत प्रल्हाद नाईक यांनी प्रभु श्री.रामाच्या प्रतिमेचे मनोभावे पुजन केले,यावेळी जय श्री.रामाची आरती घेण्यात आली,प्रसंगी श्रीराम घोषणांनी दातिवली परिसर राममय झाला, प्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपशहर प्रमुख वैष्णव नवनीत पाटील,उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे,उपविभाग प्रमुख संदीप राऊत अशोक अमोडकर,अजित माने,संजय निकम,शाखा प्रमुख दीपक उतेकर, शशिकांत कदम,प्रशांत गुढेकर,शुभम धाडवे,समीर परब,शिवाजी कुंभार,अरविंद दीक्षित,शंकर राणे,सचिन चव्हाण महिला आघाडी कविता उतेकर,सुनीता अहिरे,संगीता उतेकर,शुभदा राणे,स्वप्नाली बंदरकर,गीता पाटील,सुवर्णा जाधव,पडवळ ताई,यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडी ,युवा-युवती सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात

जाहिरात


जाहिरात
