दिव्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचा महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार…

Spread the love

ठाणे शहर – कल्याण लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार अजून अधिकृत रित्या ठरलेला नसला तरी पदाधिकाऱ्यांना मात्र या कल्याण लोकसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढविण्याचे आदेश मिळाले आहेत.दरम्यान दिव्यातील शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या निर्धार नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केला आहे.

दिवा शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा प्रमुख मार्गदर्शक कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सध्यातरी कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.याठिकाणी जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव चर्चेत आहे.यापैकी नकी कोण हे अजूनही ठरलेले नाही. यावर्षीची कल्याण लोकसभा निवडणुक इतर निवडणुकांपेक्षा प्रतिष्ठेची ठरणार आहे.याठिकाणी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांना भविष्यात उमेदवारी निश्चित होऊ शकते असे म्हटले जात आहे.आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतेही राजकीय डावपेच आखू शकतात.यात शंका नाही. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटालाही ही जागा निश्चितपणाने आपल्याकडे कोणत्याही परिस्थिती खेचून आणायची आहे.त्यामुळे या जागेवर अजून तगडा उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.जागा वाटपानुसार ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाविकास आघाडी निश्चित देणार यातही शंका नाही.परंतु ही जागा जिंकून आणण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि इतर पक्षांना हाताशी धरुनच निर्णय घेणे उचीत ठरणार आहे.त्यामुळे सध्यातरी या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

त्यामुळे दिव्यातील शिवसैनिकांनी सावध भुमिका घेत महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार गटप्रमुखांनी केला. तसेच कल्याण लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदार पर्यंत पोहचण्याचे आदेश देण्यात आले.

सदर मेळाव्यासाठी उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे आयोजन शहरप्रमुख सचिन पाटील , उपशहर प्रमुख तेजस पोरजी, शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी केले असून ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, विधानसभा संघटीका योगिता नाईक, शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर संघटीका ज्योती पाटील, प्रियांका सावंत, स्मिता जाधव ,उमेश राठोड आदी पदधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page