दिनांक 1 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून कसा असेल मार्च महिन्याचा पहिला दिवस; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 01 मार्च 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ…

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचं कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल.

▪️वृषभ :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणं सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

▪️मिथुन :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शरीर आणि मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो.

▪️कर्क :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले आणि अशांत राहील. घरात भांडणाचं वातावरण असेल. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद आणि तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.

▪️सिंह :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल.

▪️कन्या :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात – निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.

▪️तूळ :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता आणि शारीरिक कष्ट यामुळं आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल. संबंधितां बरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.

▪️धनू :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

▪️मकर :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून लाभ होतील.

▪️कुंभ :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद – सोहळा, प्रवास- पर्यटन यावर पैसा खर्च होईल. प्रवास आणि सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.

▪️मीन :

आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळं स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला आणि पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावं. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामापासून दूर राहावं. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page