19 वर्षीय वयोगट शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या मुलींची घोडदौड कायम…

Spread the love

रत्नागिरी येथे होणाऱ्या विभाग स्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी करणार सिंधुदुर्ग जिल्ह्याच प्रतिनिधित्व..

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी कुडाळ हायस्कूलच्या मुलींच्या संघाला पुढील स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा..

कुडाळ/ प्रतिनिधी:- नुकत्याच ओरस जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मुलींच्या 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे विजयाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही कणकवली संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला पुढे रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सीरस मॅडम यांनी या मुलींना शुभेच्छा दिल्या व यापुढे विभाग स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्वल करावं अशी अपेक्षा ठेवली. या मुलीना कुडाळ हायस्कूलचे क्रीडा शिक्षक वैभव कोंडसकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या मुलांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page