कोकण ते खान्देश विदर्भ मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणारी गाडी नागपुर मडगाव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेसला मुदतवाढ..

Spread the love

मुंबई l 27 मार्च- नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला नॉन मान्सून ३ मार्च २०२४ ते ८ जुन २०२४ व मान्सून १० जुन२०२४ ते ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खान्देश, विदर्भ ते कोकण चालणारी नागपुर मडगांव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेस ३० जुन २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे.

खान्देश, विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी (रजि), राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं. ते मडगाव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेस ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता ३० जुन २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपुर जं. ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपुर जं. येथून दर बुधवार, शनिवारी दु.०३.०६ वाजता सुटून गुरुवार, रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४६ वाजता पोहोचेल. मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार, रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल

नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं,अकोला जं, शेगांव, मलकापूर,भुसावळ जं, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ५४ फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.enquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व NTES ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण २४ मार्च२०२४ पासून आरक्षण खिडकीवर सुरु करण्यात आले आहे.

नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा सुपरफास्ट बि-विकली एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव सल्लागार व सदस्य ॲड.श्री.पुरुषोत्तम डांगरा संजय त्रिवेदी, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख, सौ.माधुरी शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संघटनमंत्री- देवगड संपर्कप्रमुख ओमकार उमाजी माळगांवकर, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, प्रवासी सुधीर राठोड, अनिल राठोड, दिपक सोनवणे, विदर्भ-खान्देश कृषी विद्यापीठ-मेडिकल कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी वर्गाकडून करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page