नेरळ: सुमित क्षिरसागर – कर्जत मतदार संघात निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे.काल सायंकाळी ५ वाजता प्रचाराचा थोफा थंडावल्या आहेत.
प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा कडून आमचा उमेदवार निवडून येणार हेच बोलण्यात येत आहे. तरी आता सामन्य माणसाला एक गोष्टीची उत्कंठा वाढली आहे की नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये कोन आघाडी घेणार हे येत्या २३ तारखेला दिसणार आहे.
नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड ची रचना बगितली तर २ पंचायत समित्या आणि नेरळ शहरा मधल मताधिक्य कुठल्या उमेदवाराचा पारड्यात पडणार हे येत्या २० तारखेला दिसणार आहे.विधानसभेचा निवडणुकी नंतर येणारी नेरळ ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद निवडणूक याची गणित बांधण्यास जुळवा जुळव होणार हे नक्की.
कर्जत मतदार संघात नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लडत तिन उमेदवार त्यामध्ये विधमान आमदार महेंद्र थोरवे(शिंदे गट), अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि नितीन सावंत (उबाठा) या तिघांन मध्ये दिसणार आहे.
नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये कोणी किती निधी खर्च केला त्या उमेदवाराचा मागे की नवीन उमेदवाराचा मागे सामन्य नागरिक(मतदार ) मतदान करतो ते येत्या २० तारखेचा मतदानातून चित्र स्पष्ट होईल.