पनवेल-: 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदानाचा हक्क केले असून एकूण 54.87 टक्के मतदान झाले होते, यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 77 हजार 742 तर महिला मतदार 6 लाख 40 हजार 651 मतदार होते. मतमोजणीच्या अंतिम निकालाअंती शिवसेनेचे श्रीरंग बारणे 96615 मतांनी विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे-पाटील हे पराभूत झाले आहेत
विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले अंदाजे मतदानाची आकडेवारी पाहता188-पनवेल विधानसभा मतदार संघ
एकूण 5 लाख 91 हजार 398 इतके मतदार असून 2 लाख 95 हजार 973 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 65 हजार 498 पुरुष तर 1 लाख 30 हजार 455 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत पनवेल विधानसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना 150924 तर संजोग वाघेरे-पाटील यांना 119886 मते मिळाली.या मतदारसंघात बारणे यांना 31038 मतांची आघाडी मिळाली. 189-कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 9 हजार 208 मतदार असून त्यापैकी 1 लाख 89 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 2 हजार 512 पुरुष तर 87 हजार 340 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या अंतिम फेरीत कर्जतमधून श्रीरंग बारणे यांना 75534 तर संजोग वाघेरे-पाटील यांना 93194 मते मिळाली.या मतदारसंघात वाघेरे-पाटील यांना 17660 मतांचे मताधिक्य मिळाले.*
190- उरण विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 19 हजार 311 मतदार असून त्यापैकी 2 लाख 14 हजार 169 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 13 हजार 75 पुरुष तर 1 लाख 1 हजार 90 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.मतमोजणीच्या अंतिम फेरीत उरण मधून श्रीरंग बारणे यांना 91285 तर संजोग वाघेरे-पाटील यांना 104535 इतके मतदान झाले.यामध्ये वाघेरे-पाटील यांना 13250 मतांचे मताधिक्य मिळाले.
204-मावळ विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 73 हजार 408 मतदार असून त्यापैकी 2 लाख 6 हजार 949 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 14 हजार 271 पुरुष तर 92 हजार 677 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत *मावळ विधानसभा मतदारसंघामधून
श्रीरंग बारणे यांना 94800
तर संजोग वाघेरे-पाटील यांना 89865 इतकी मते मिळाली.यामध्ये बारणे यांना 4935 मतांचे मताधिक्य मिळवून आघाडीवर होते.
205 -चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण 6 लाख 18 हजार 245 मतदार असून त्यापैकी 3 लाख 22 हजार 700 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 80 हजार 145 पुरुष तर 1 लाख 42 हजार 550 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत चिंचवड मधून श्रीरंग बारणे यांना 186235 तर संजोग वाघेरे-पाटील यांना 111470 मते मिळाली.याठिकाणी बारणे यांना 74765 मतांची आघाडी होती. हीच आघाडी त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली.
206 -पिंपरी विधानसभा मतदार संघात
एकूण 3 लाख 73 हजार 448 मतदार असून त्यापैकी 1 लाख 88 हजार 795 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 2 हजार 241 पुरुष तर 86 हजार 539 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या अंतिम फेरीत पिंपरीत श्रीरंग बारणे यांना 93323 तर संजोग वाघेरे-पाटील यांना 76592 मते मिळाली.याठिकाणी सुद्धा बारणे यांना 16731 मतांची आघाडी मिळाली.
मावळमध्ये झालेल्या या लढतीत श्रीरंग बारणे यांना एकूण मतदान 692832 झाले तर संजोग वाघेरे-पाटील यांना 586217 इतके मतदान झाले.श्रीरंग बारणे हे 96615 ची आघाडी घेऊन हॅटट्रिक साधत विजय श्री खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत.