खालापूर तालुक्यातील हाळ गावातील अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त , खालापूर पोलिसांची मोठी कारवाइ….

Spread the love


खोपोली – खालापूर तालुयातील हाळ गाव, हाळ खुर्द, बुद्रुक या तिनही गावातील अवैध कत्तलखाने खालापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. सदर कारवाई करताना तिनही हाळ गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक केले आहे. तर खालापूर पोलिसांच्या मोठ्या कारवाईचे स्वागत होत आहे.

होळी सणाची तयारी सुरू असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोहत्या केल्याची घटना घडली होती. यादरम्यान गोरक्षक आणि मुस्लिम महिला आणि गावकरी यांच्यात दगडफेक झाली. यामध्ये पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केल्याची घटना दि. १२ मार्च रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले होते. यामुळे खालापूर तालुयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या दोन तुकड्या तयार करून बारा जणांना अटक केले होते. गोवंश हत्याबंदी असतानाही अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून नये यासाठी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी आपल्या पोलीस अधिकारी यांच्यासह हाळ गाव, हाळ खुर्द, बुद्रुक गावात जावून लोकांचे प्रबोधन केले.

गावर्‍यांच्या मदतीने मुस्तकीन रशीद पटेल, राहणार हाळ बुद्रुक, रियाज कादिर जळगावकर, जावेद लियाकत सोंडे, राहणार हाळ बुद्रुक, सईद धतुरे, राहणार मधले हाळ, मुजिब हयात जळगावकर, रा. हाळ बुद्रुक यांच्या घराशेजारचे गाई गोठा, अनधिकृत बांधलेले पत्राचे शेड नष्ट केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page