
कल्याण: कल्याण डोबिंवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे, असा हल्लाबोल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराण्यावर बोलू नये, असा इशारही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ते अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत घराणे-शाहीवर बोलले आहेत. पंतप्रधानांनी घराण्यावर बोलू नये. तुम्ही आमच्या घराण्यावर बोलाल, तर आम्हीही तुमच्या घराण्यावर बोलू. घरांदाज असलेल्यांनी घराणे-शाहीवर बोलावं. घरंदाज नसलेल्यांनी घराणे-शाहीवर बोलू नये. घराण्याची परंपरा काय असते, हे मोदींना माहिती नाही. त्यामुळे आजपर्यंत मदत करत आलेली ठाकरेंची घराणेशाही मोदींना नकोशी झाली आहे.”
आता गद्दरांची घराणेशाही मोदींना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण- डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेत नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधारायची आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेंवर तोफ डागली आहे.
जाहिरात



जाहिरात

