डोंबिवलीच्या पलावा इथल्या एका आठ मजली इमारतीला आग
ठाणे वृत्त: डोंबिवलीच्या पलावा इथल्या एका आठ मजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीमधील एका घराला आग लागल्यानंतर ती संपूर्ण इमारतीमध्ये पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.