कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ दिव्यात भव्य रँली…

Spread the love

दिवा (प्रतिनिधी )- कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज ९ मे रोजी दिव्यात बेडेकर नगर ते दिवा स्टेशनपर्यंत महायुतीची भव्य रॅली काढण्यात आली असून यानिमित्त दिवा शहरात भगवामय वातावरण झाले होते.शिवसेना शिंदे गट,भाजपा आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रँलीत मोठा सहभाग दर्शविला होता.

कल्याण लोकसभा निवडणुकीचे मतदान २० मे रोजी पार पडत असून अवघे १० दिवस प्रचारासाठी शिल्लक आहे.जसजसे तारीख जवळ येत आहे,तसे लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचत आहे.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या प्रचारार्थ महायुतीच्यावतीने भव्य रॅली दिवा शहरातून काढली.यावेळी शहरात जागोजागी तिन्ही पक्षांचे झेंडे रोवण्यात आले होते.त्यामुळे वातावरण भगवामय झाल्याचे दिसून आले. प्रचार रँलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला,शिवसेनेचा वाघ आला,एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,अश्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.ढोल आणि ताश्या,डिजेच्या गाण्यांवर डाँ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सूर लावण्यात आले होते.

या महायुतीच्या रॅलीत दिवा शहरातील शिवसेनेचे (शिंदे गट),रिपब्लिकन पक्ष,भाजपा आणि मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रँलीत सहभागी झाले होते.तर यावेळी डाॅ श्रीकांत शिंदे यांचे दिव्यातील ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन स्वागत करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page