
ठाणे: निलेश घाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट.यामध्ये प्रामुख्याने कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या विकास कामांच्या बाबतीत चर्चा . तसेच केलेला पत्रव्यवहार पाठपुराव्यामुळे पलावावासीयांची अतिरिक्त करामधून सुटका केल्याने पलावा मधील कासा बेला,कासाबेला गोल्ड, कासारिओ व गोल्फलिंक च्या फेडरेशनच्या अध्यक्ष व प्रतिनिधींसह आयुक्तांची भेट घेऊन आभार मानले व पुढील प्रक्रिये संदर्भात चर्चा करण्यात आली.

•.२७ गावात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाचा आढावा घेत तातडीने अडचणींवर मात करून योजना कार्यन्वित करण्याच्या सूचना करल्या आहेत.तसेच जिथे अडचणी येतील तिथे स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले
•.पलावा आयटीपी प्रकल्पाचे कर हे ६६% माफ करण्यात आले आहे.त्यात आता केडीएमसी कश्या पध्दतीने नियोजन करून नागरिकांना सहकार्य करणार आहे या संदर्भात चर्चा केली आहे.आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पलावा वासीयांची जो न भरलेला कर आहे त्यासंदर्भात आयुक्तांनी अभय योजना कार्यन्वित करणार असल्याचे सांगितले असून या संदर्भात शिबीर देखील घेतली जाणार आहेत.

• .कल्याण डोंबिवली मधील फेरीवाल्यांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करण्यात आली तसेच निष्क्रिय अधिकारी बदलून नवीन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्टेशन परिसर फेरीवाले मुक्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
•.डोंबिवली पश्चिम भागात महावितरणचे सब स्टेशन आवश्यक आहे.त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील जवळपास १ लाख घरांना अखंड वीज पुरवठा होऊ शकतो.मात्र त्यासाठी आरक्षित जागा उपलब्ध नसल्याने काम अडकून राहिले आहे.या संदर्भात आयुक्तांशी चर्चा केली असून आयुक्तांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं आहे.
•.मानकोली पुलाच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात देखील आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर,डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, यांसह अन्य सहकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जाहिरात

