पत्रकार प्रशांत सिनकर यांना ‘उत्तम भारत आणिअचिवर आयकॉन अवॉर्ड-2024 पुरस्कार!

Spread the love

ठाणे : निलेश घाग पर्यावरण संवर्धनविषयक जनजागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर यांना जम्मू-काश्मीर येथील जी.एच.आर.टी. संस्थेचा ‘उत्तम भारतआणि जबलपूरमधील एस.एन.ए. संस्थेचा ‘अचिवर आयकॉन अवॉर्ड 2024 अशा दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

पत्रकारिता करत असताना पर्यावरण संवर्धनासाठी बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पत्रकार प्रशांत सिनकर यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्टयांच्या माध्यमातून दिला जाणारा ‘उत्तम भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एच. आर. रेहमान यांनी दिली.

तर मध्य प्रदेश-जबलपूरमधील ‘समय न्यूज एजन्सीच्या वतीने ‘अचिवर आयकॉन अवॉर्ड 2024 हा पुरस्कार देऊन प्रशांत सिनकर यांना सन्मानित केले आहे. मुंबई-ठाणे-पालघर जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनविषयक बातम्यांतून जनजागृती करण्यास प्रशांत सिनकर यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव शासन तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. या अगोदर प्रशांत रवींद्र सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शि. म. परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-2013 पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी संलग्न काम करणाऱ्या नव्या फाऊंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान 2023 अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page