आरोग्याचा मूलमंत्र पत्रकारांनी जपावा : संदीप काळे‘
ठाणे : निलेश घाग सामाजिक स्वास्थ्याची जडणघडण व्यवस्थित ठेवणाऱ्या पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य जपावे. इतिहास निर्माण करणाऱ्या, समाजाची धुरा खांद्यावर घेत सामाजिक घडी व्यवस्थित जपणाऱ्या पत्रकारांनी राज्यभर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सुरू केलेल्या पत्रकार आरोग्य संजीवनी उपक्रमात स्वतः, आपल्या कुटुंबाला सहभागी करून घ्यावे, असे आवहान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आज ठाणे येथे केले. पत्रकार आरोग्य संजीवनी या पत्रकार, पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कार्यक्रमाची सुरुवात आज संदीप काळे यांच्या हस्ते ठाण्यामधून झाली, त्यावेळी तो बोलत होते.
आजपासून ते येत्या १२ मार्चपर्यंत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य तपासणी आणि आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार आहे. ठाण्यामधल्या टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये संदीप काळे बोलत होते. त्यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संदीप काळे म्हणाले, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांची एक पंचसूत्री तयार केली होती. त्या पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्यात देशात आणि आता जगातल्या २१ देशांमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने काम सुरू केले आहे. हे काम सुरू करताना पत्रकार आणि पत्रकारिता हे दोन विषय समोर ठेवले. कृतिशील कार्यक्रमांमुळे सर्वच ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कामाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पत्रकारांचे घर, पत्रकार आणि पत्रकाराच्या कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांनी नवीन काहीतरी शिकले पाहिजे आणि पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, या ‘पंचसूत्री’ प्रमाणे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने जगभरात आपले काम वेगाने वाढवले. महाराष्ट्र राज्यातील पत्रकार आणि त्याचे कुटुंब हेल्दी राहावेत, या उद्देशातून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्णतः तपासणी, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, सर्व आजाराचे निदान, लागणारी औषधे, असणाऱ्या आजारांचा लेखाजोखा, त्यावर सातत्याने मोफतपणे उपचार अशी मोहीम हाती घेतली. या महिनाभरात साडेचार हजार पत्रकार आणि त्यांच्या बारा हजार कुटुंबांतील सदस्य यांची तपासणी केली जाणार आहे. त्यांना कार्ड देण्यात येणार आहे.
आज ठाणे, उद्यापासून सगळा महाराष्ट्र कव्हर करायचाय, त्यानंतर देशातले सगळे राज्य पूर्ण करायचे. पुन्हा जगामध्ये ज्या ज्या देशात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे काम सुरू आहे तिथे हा आरोग्याचा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती ही संदीप काळे यांनी यावेळी दिली. आरोग्य अधिकारी डॉ. कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्य विंगचे प्रमुख भिमेश मुतूला. राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, राज्य उपाध्यक्ष भालचंद्र पिंपळवाडकर, कोकण व मुंबई विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर गवई यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार रसाळ, महानगर अध्यक्ष जितेंद्र पाटील, महानगर कार्याध्यक्ष चंद्रभूषण प्रभुळकर, महानगर उपाध्यक्ष दीपानकर घोष, संदीप जाधव, भुजंगराव सोनकांबळे, धर्मा गायकवाड, महानगर महासचिव सुदाम खारकर, महासचिव निलेश पाटील, महानगर सहसचिव हर्षदा मेस्त्री, महानगर कोषाध्यक्ष, शिवप्रकाश मिश्रा, कार्यवाहक राकेश रासकर, कार्यवाहक जितेंद्र मिश्रा, संघटक कृष्णा यादव, संघटक प्रति पांडे, प्रसिद्धी प्रमुख कल्याणी भांगरे आदीनी या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी परिश्रम घेतले
जाहिरात