● खांदा कॉलनी -पुणे अपघात प्रकरणानंतर पब आणि बार
व्यवसायाच्या हफ्तेखोरीला सुरूंग लागले. असतानाच खांदा कॉलनीत आसूडगावातील निवासी संकुलात बेकायदेशीर सुरू असलेल्या
‘इंटरनेट बार’चा धुमाकूळ चर्चेत आला आहे. एकाच बेकायदेशीर इमारतीत तळ मजल्यावर बार, दुसन्या मजल्यावर ऑर्केस्ट्रा, तिसऱ्या मजल्यावर डान्सवार आणि कुंटणखाना सुरु आहे. बोगस नोकरनामा आणि ५० नर्तिका तिकडे ग्राहकांना घायाळ करून लूट करीत आहेत. या व्यवसायाचा महिन्याला १५ लाखांचा हफ्ता दिला
जातो, असे सांगण्यात येते. विशेष
म्हणजे चार वर्षांपासून बारचा परवाना नूतनीकरण झाला नसतानाही हे अवैध धंदे कुणाच्या अभयहस्ताने सुरू आहेत?
नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी कूस बदलावी!
रायगड जिल्ह्यातील पनेवल, खालापूर भागात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या डान्स बारच्या आडून ‘सेक्सचा बाजार’ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश, बांगलादेश, कोलकता, पश्चिम बंगाल, मुंबई, नेपाळ, या ठिकाणांहून पैसा कमविण्यासाठी पनवेलमध्ये आलेल्या बारबालांनी इथल्या तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. पनवेल परिसरात रात्री उशिरापर्यत धिंगाणा सुरु असून, वेश्या व्यवसाय देखील सुरु असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांचा या प्रकारांना पाठिंबा आहे का, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्या नंतरही ऑर्केस्ट्राच्या नावावर सुरु असलेल्या बारमध्ये अवैध धंदे सुरूच आहेत.
पनवेल खालापूर ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालू ….
पनवेल, खालापूरमध्ये सुरु असलेले अनधिकृत डान्स बार आणि त्यामध्ये चाललेले आक्षेपार्ह प्रकार किळसवाणे असून अनेकदा तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचा आरोप अनेक वेळा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. डान्स बारमध्ये आलेला तरुण भिकेकंगाल बनतोय. त्याचा संसार अक्षरश: देशोधडीला लागतोय. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होताच मिलिंद भारंबे यांनी परिसरातील अवैध धंद्यावर निर्बंध आणले होते. आयुक्तांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिसरातील अवैध धंदे काही प्रमाणात कमी झाल्याने आयुक्त भारंबे यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. आता मात्र परस्थिती बदलली असून, अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत.