रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. कसोटीतील त्याने ३५व्या पाच विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने चार आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.
India vs England, 4th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, भारताचा पहिला डाव आज सकाळी ३०७ धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लिश संघाकडे ४६ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत इंग्लिश संघाची एकूण आघाडी १९१ धावांची असून भारताला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
जर टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी मिळवेल. पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी आणि तिसरी कसोटी भारताने जिंकली. रविचंद्रन अश्विनने पाच विकेट घेतल्या. त्याने ३५व्या पाच विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कुलदीपने चार आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने सर्वाधिक ६० धावा केल्या.
इंग्लिश फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर टेकले गुडघे –
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेट १५ धावा करून बाद झाला. ऑली पोप एकही धाव न काढता रवी अश्विनचा बळी ठरला. जो रूट ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स ४ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. तर बेन फॉक्सने १७ धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे इंग्लिश संघ अवघ्या १४५ धावांवर गारद झाला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य आहे.
तिसऱ्या दिवशी विजयासाठी भारताला १५२ धावांची, तर इंग्लंडला १० विकेट्सची गरज –
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर ८ षटकानंतर बिनबाद ४० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर नाबाद परतले. आता भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी १५२ धावा करायच्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १० विकेट्स घेण्याचा गरज आहे.