किंग कोहलीच्या ‘विराट’ संघर्षानंतर भारताचा दारुण पराभव, दक्षिण आफ्रिकेने एक डाव ३२ धावांनी उडवला धुव्वा…

Spread the love

आता दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.

सेंच्युरियन:- सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. गुरुवारी (२८ डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात १३१ धावांवर सर्वबाद झाली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डीन एल्गर, मार्को जॅन्सेन आणि कागिसो रबाडाने मोलाचे योगदान दिले. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

विराट कोहलीच्या रूपाने भारताला १०वा धक्का बसला. मार्को जॅन्सेनच्या चेंडूवर त्याने अप्रतिम फटका मारला, पण धावत जाऊन कागिसो रबाडाने उत्कृष्ट झेल घेतला. विराट ८२ चेंडूत ७६ धावा करून कोहली बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि एक षटकार मारला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्नही भंगले. आता दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.

भारताचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले –

दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तसेच शुबमन गिलने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रेयस अय्यर सहा, यशस्वी जैस्वाल पाच, केएल राहुल चार, मोहम्मद सिराज चार आणि शार्दुल ठाकूर दोन धावा करून बाद झाला. रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. प्रसिध कृष्णा खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने चार, मार्को जॅनसेनने तीन आणि कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले.

डीन एल्गरचे द्विशतक हुकले –

त्तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी डीन एल्गरने शानदार फलंदाजी केली आणि तो द्विशतकाच्या जवळ असताना १८५ धावांवर तो शार्दुल ठाकूरच्या शॉर्ट बॉलवर केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अश्विनने १९ धावांच्या स्कोअरवर कोईत्झेला बाद केले. शेवटी बुमराहने रबाडाला एका धावेवर आणि नांद्रे बर्जरला शून्यावर बाद केले. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही आणि आफ्रिकेचा डाव ४०८ धावांवर आटोपला.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कमजोर दिसला आहे. यंदा देखील याचा प्रत्यय पाहायला मिळाला. मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली.

पण, भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (२२) धावा केल्या. पण, विराट खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (५) काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात रोहित चमकदार कामगिरी करून सामन्यात संघाचे पुनरागमन करेल अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारतीय कर्णधार स्वस्तात बाद झाला. कगिसो रबाडा रोहितसाठी काळ ठरला अन् त्याने अप्रतिम चेंडू टाकून हिटमॅनचा त्रिफळा काढला. रोहितपाठोपाठ यशस्वी जैस्वाल (५) देखील तंबूत परतला. त्यानंतर जणू काही विकेटांची मालिकाच सुरू झाली. भारताकडून शुबमन गिल (२६), श्रेयस अय्यर (६), लोकेश राहुल (४), आर अश्विन (०), शार्दुल ठाकूर (२), जसप्रीत बुमराह (०), मोहम्मद सिराज (४) आणि विराट कोहलीने (७६) धावांचे योगदान दिले.

दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला. टीम इंडियाकडून लोकेश राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी खेळली. तर, दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले.

भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो

सामन्याच्या पहिल्याच दिवशी कगिसो रबाडाने भारताच्या आशेवर पाणी टाकले. पहिल्या दिवसअखेर भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. भारताने केवळ १२१ धावांत सहा गडी गमावले. लोकेश राहुल ७० धावांवर नाबाद खेळत होता. तर, शार्दुल ठाकूर (२४), जसप्रीत बुमराह (१), आर अश्विन (८), श्रेयस अय्यर (३१), विराट कोहली (३८), शुबमन गिल (२), रोहित शर्मा (५) आणि यशस्वी जैस्वाल (१७) धावा करून तंबूत परतला होता. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी राहुलने १०१ धावांची शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला. १२१ धावांत सहा गडी गमावल्यानंतर टीम इंडियाला तिथून १५० धावा करणे कठीण झाले होते. मात्र, मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या राहुलने सावध खेळी आणि भारताने आपल्या पहिल्या डावात ६७.४ षटकांत सर्वबाद २४५ धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page