ठाण्यातील डाॅक्टर दाम्पत्याची डाॅक्टरांकडूनच फसवणूक, रुग्णालयाच्या नावाखाली गैव्यवहार

Spread the love

ठाणे: निलेश घाग भिवंडी येथील एक खासगी रूग्णालय टिटवाळा येथील दोन डाॅक्टर आणि त्यांच्या पत्नीने चालविण्यास घेतले. या उपक्रमात ठाण्यातील एका डाॅक्टर दाम्पत्याला सहभागी करून घेतले. रूग्णालय चालविण्यासाठी लागणारा खर्च, वैद्यकीय साधनांसाठी टिटवाळ्यातील डाॅक्टरांच्या गटाने ठाण्यातील डाॅक्टर दाम्पत्याकडून कर्ज घेऊन, अन्य मार्गाने पैसे उकळले. त्यानंतर ते पैसे स्वताच्या स्वार्थासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

या प्रकरणात फसवणूक झाल्याने ठाण्यातील डाॅक्टर दाम्पत्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ठाण्यातील डाॅक्टर रूपा संदीप राव (फिजिओथेरेपिस्ट) यांनी या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. डाॅ. राव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डाॅ. दिनेश सुखदेव डोळे, डाॅ. नवलकिशोर अण्णासाहेब शिंदे, शितल नवलकिशोर शिंदे, वैशाली दिनेश डोळे यांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

जुलै २०२१ मध्ये ऑरेंज रूग्णालय भाडे तत्वावर चालविण्यास सुरूवात झाली. डाॅ. नवल किशोर शिंदे रूग्णालयाचे दैनंदिन व्यवस्थापन बघत होते. Dr. murudkar यांना पहिल्या टप्प्यात २० लाख रूपये भाडे देण्यात आले. आरोपींनी राव दाम्पत्याला रुग्णालयातील वैद्यकीय साधने, औषध दुकान, रूग्णालय तोट्यात अशी विविध कारणे सांगून पैसे उकळण्यास आणि कर्ज घेण्यास भाग पाडले. दर.sandeep rao यांच्या नावाने दोन कोटी पाच लाख ५० हजार रूपयांचे कर्ज बँकेतून मंजूर करून घेण्यात आले. राव यांनी यामधील एक कोटी ९४ लाख २३ हजार रूपये मालविका हाॅस्पि.केअर कंपनीच्या नावे वर्ग केले.

बँक व्यवहारात राव दाम्पत्याला अंधारात ठेऊन काही गोष्टी आरोपींकडून केल्या जात होत्या. जी.स.एस.टी क्रमांक काढणे, रुग्णालयात जमा होणारी दैनंदिन रुग्ण सेवेतील रक्कम खर्चासाठी वापरली जात असल्याचे राव यांच्या निदर्शनास आले. एक कोटी ९४ लाख रक्कम आरोपींनी रुग्णालयासाठी न वापरता स्व:ताच्या फायद्यासाठी वापरली. दरम्यान कर्जाचे हप्ते थकीत राहिल्याने राव दाम्पत्याला बँकेकडून विचारणा होऊ लागली. हप्ते भरण्यासाठी राव कुटुंबाला मानसिक त्रास देण्यात येऊ लागला. व्यवसायात अडथळे आणले. चुकीच्या व्यवहारांमुळे डॉ.राव यांना न्यायालयात जावे लागले. या गैर-प्रकारामुळे राव कुटुंबाला आरोपींच्या मालविका भागीदार कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी बँकेतील कर्जाऊ रक्कम भागीदार रुग्णालय व्यवस्थापनासाठी न वापरता आपली फसवणूक केली म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्यात डाॅ. रूपा राव यांनी तक्रार केली आहे. ऑरेंज रुग्णालयाचे डाॅ. मुरूडकर यांनीही आरोपींना रुग्णालयाचा ताबा सोडण्याची नोटीस दिली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page