इंडिया आघाडीचा मुस्लिमांना आरक्षण देण्याचा खतरनाक प्लान – पंतप्रधान मोदी…

Spread the love

अहमदनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडीया आघाडीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीचा देशात मुस्लीम आरक्षण लागू करण्याचा खतरनाक प्लान असल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि आघाडीवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळावर आरोप केले. काँग्रेसने फक्त आपल्या नेत्यांचे खिशे भरले. आम्ही विकास आणि संरक्षण याच्यावर भर दिला. असं ही ते म्हणाले. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला लोकांचं मोठं पाठबळ मिळत आहे. भाजप आणि एनडीएचे मुद्दे काय आहेत तुम्हीच बघा. एनडीएचा मुद्दा विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान पण काँग्रेस या पैकी कोणत्याही मुद्द्यावर बोलते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

‘गरीब कल्याणवर बोललो तर काँग्रेस रेतीमध्ये लपून बसेल. त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही नाहीये. त्यांनी ५० वर्षात गरीबी हटवण्यासाठी खोटी आश्वासने दिले. गरीबांचा सर्वात मोठा विश्वात घात केला. मोदी ८० कोटी लोकांना मिळत असलेल्या राशनचा हिशोल देईल. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीचा हिशोब देईल.’

‘काँग्रेस तोंडावर पट्टी बांधेणार आहे. काँग्रेस आणि इंडी अलायन्स सर्वात खतरनाक खेळ खेळण्यात लागले आहेत. इंडी आघाडीतील एका मोठ्या चेहऱ्याने नकाब बाजुला केला आहे. बिहारमध्ये जे आता जेलमधून बाहेर आले आहेत. लालू यादव यांनी म्हटले की, इंडी आघाडी सत्तेत आले तर देशात संपूर्ण आरक्षण देणार. याचा अर्थ संपूर्ण आराक्षण कोणाकडे आहे. एससी, एसटी, ओबीसी, गरीब यांच्याकडे आहे. आता ते म्हणतात की संपूर्ण आरक्षण हिसकावून मुस्लमांना देणार आहेत. आपल्या वोट बँकसाठी ते हे काम करणार आहे. जे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी रोखले होते तेच पाप काँग्रेस आणि आघाडीतील पक्ष करणार आहेत.’

‘इंडी आघाडी संविधान बदलू इच्छित आहेत. आपल्या वोट बँकेला खूश करण्यासाठी हा प्रयत्न आहे. हे कोणत्याही थराला जावू शकतात. तुम्ही असं होऊ देऊ इच्छिता का.’

‘मुंबईत २६-११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमधून झाला होता. आपल्या जवानांना कोणी शहीद केले. आपल्या लोकांची हत्या कोणी केली होती. तुम्हाला हे सत्य माहित आहे. सगळ्या जगाला हे माहित आहे. पाकिस्तानने देखील हे स्वीकारले आहे. पण काँग्रेस पक्ष दहशतवादी बेकसुर असल्याचे सर्टिफिकेट देत आहे. मुंबई हल्ल्याबाबत काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य खूपच खतरनाक आहे. कसाबची बाजु हे घेत आहेत. काँग्रेसचे परराष्ट्र मंत्री राहिलेले हे नेते कसाबला निर्दोष म्हणत आहेत. हा शहिदांचा अपमान आहे. देशाला कुठल्या बाजुला काँग्रेस घेऊन जात आहे. काँंग्रेसचा स्तर खाली जात आहे. अशा इंडी आघाडीला महाराष्ट्रात एकही सीट मिळायला हवी का? ‘

‘मोदीने गेल्या दहा वर्षात सुरक्षा आणि विकास दोघांची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसने सुरु केलेल्या समस्या आम्ही संपवल्या. येथे सुरु झालेल्या डॅमचे काम १९७० मध्ये सुरु झाले होते. आज त्याची किंमत करोडो रुपयांनी वाढली आहे. हे पाप काँग्रेसचे आहे. काँग्रेसने नेत्यांचा खिशा भरला. पण शेतकऱ्यांची जमीन कोरडी राहिली. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती दिली. यामुळे नाशिक आणि अहिल्यानगरमधील शेकडो गावांना पाणी मिळणार आहे.’

‘आज महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. हायवे निर्माण होत आहे. रिंगरोड आणि एक्सप्रेस वे, एअरपोर्ट, वंदे भारत रेल्वे सगळ्या गोष्टींवर आमचे लक्ष आहे. यामुळे रोजगार वाढणार आहे. १३ मे ला तुमचं मत देश आणि महाराष्ट्राचं भविष्य ठरवणार आहे. तुमचे मत मोदींना जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक मतदान करा.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page