वेळणेश्वर (गुहागर)- भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संतोष जैतापकर यांनी अचानक अर्ज मागे घेण्याच्या अर्धा तास वेळेपूर्वी हेलिकाँप्टरने एन्ट्री करुन आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महायुतीच्या विजयासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून महायुतीचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे प्रमुख लढत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात होणार असून आता जनतेचे लक्ष याकडे लागून आहे.
गुहागर विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे राजेश बेंडल रिंगणात असून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करुन भाजपला धक्का दिला आहे. त्यातच भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, जैतापकर यांनी आज सोमवारी अचानक अर्ज मागे घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अर्ज दाखल करताना जैतापकर यांनी, मी ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून येईन असे वक्तव्य केले होते. मात्र, अचानक एका रात्रीत जादूची काडी फिरल्यासारखे झाले आणि जैतापकर यांनी अर्ज मागे घेऊन एक पाऊल मागे घेऊन मी महायुतीबरोबर असून बेंडल यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावेन, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, जैतापकर यांनी आज सोमवारी अचानक अर्ज मागे घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अर्ज दाखल करताना जैतापकर यांनी, मी ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून येईन असे वक्तव्य केले होते. मात्र, अचानक एका रात्रीत जादूची काडी फिरल्यासारखे झाले आणि जैतापकर यांनी अर्ज मागे घेऊन एक पाऊल मागे घेऊन मी महायुतीबरोबर असून बेंडल यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावेन, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.