‘मँगो बर्फीचे’ शानदार लॉन्चिंग!
चिपळूण: वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या चिपळूण शहरातील ७ व्या शॉपीचा भोगाळे येथील चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये बुधवार दि. १७ रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक उदय गांधी व लियाकत कासकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या ‘मॅंगो बर्फीचे’ लॉन्चिंग करण्यात आले असून १५ दिवसांतच ही बर्फी बाजारपेठेत उपलब्ध होईल. अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी डेअरी हा दुग्ध प्रकल्प सुरू झाल्यापासून या प्रकल्पाचे ४७ दूध संकलन केंद्र असून या माध्यमातून ४ हजार ९७ शेतकरी दररोज ३२ हजार लिटर दूध संकलित करीत आहेत. त्यामधील १५ हजार लिटर दूध हे दुग्धजन्य पदार्थ उत्पादनासाठी वापरले जाते. या पदार्थांना ग्राहकांची उत्तम पसंती मिळाली आहे.
यामध्ये दूध, दही, लस्सी, ताक, मसाला ताक, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, तूप, फ्लेवर्स, मिल्क, पनीर, पेढा, सॉफ्टी आईस्क्रीम, खवा या पदार्थांचा समावेश आहे.
यातून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या ११ शॉपी ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये चिपळूण शहरात सहा, महाड व भरणे येथे प्रत्येकी १, दापोली येथे दोन तर चिपळूण शहरात सातव्या शॉपीचे भोगाळे येथील चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रेरणास्थान सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सूर्यकांत खेतले, संचालक अशोकराव कदम, सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, संचलिका सौ. स्मिता चव्हाण, ऍड. नयना पवार, निहार जोशी, माजी नगरसेवक रमेश खळे, आत्माराम नारकर, विलास नामजोशी, रमण डांगे, संदेश किंजळकर, अभिजित संसारे, प्रसाद आवले, चिपळूण नागरीचे अधिकारी प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे श्री. मगदूम, जितेंद्र पालकर, तानाजी निंबाळकर, विजय राजेशिर्के आदी उपस्थित होते.