चिपळूण: चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विखारे परिवारापैकी डॉक्टर प्रभाकर (आप्पा) विखारे यांचे नातू तसेच डॉ. दीपक विखारे व डॉ. सुस्मिता विखारे यांचे सुपुत्र डॉ.वेद आणि स्नुषा डॉ. प्रियांका यांच्या ॲपेक्स डायग्नोस्टिक अँड फिटल मेडिसिन सेंटरचा भव्य शुभारंभ नुकताच चिपळूण चिंचनाका येथील बैतूल खातिजा बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या दालनामध्ये, चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथयश सर्जन डॉ. रत्नाकर घाणेकर, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन श्री. मोहन मिरगल, माजी चेअरमन श्री. निहार गुढेकर, श्री. सतीशआप्पा खेडेकर, वैश्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. हेमंत शिरगावकर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे श्री. हमीद दलवाई, माजी नगरसेवक श्री. अशोक गांधी तसेच विखारे कुटुंबीय आणि चिपळूणच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज यंत्रणेसह सज्ज असणाऱ्या या वैद्यकीय दालनास आमदार श्री. शेखर निकम, माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, माजी आमदार श्री. रमेशभाई कदम, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव, सी. जी. पी. ए च्या अध्यक्षा डॉ. जलश्री चाळके, निमाचे अध्यक्ष डॉ. चैतन्य खोत, डॉ. दिलीप पाटील, डॉ. इसहाक खतिब, डॉ. विक्रम घाणेकर, डॉ. संजीव साने, डॉ. गौरी साने, डॉ. विकास नातू, डॉ. विनिता विनय नातू, डॉ. विवेक नातू, सौ. नीला नातू तसेच चिपळूणच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. वेद दीपक विखारे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सदर दालनास प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.
डॉ. वेद दीपक विखारे हे एम. बी. बी. एस. ,एम.डी. (रेडिओ डायग्नोसिस) असून फिटल मेडिसिन ही पदवी त्यांना मुंबई येथे मिळाली असून यापूर्वी त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई फोर्टिज हॉस्पिटल नोएडा, आर. एस. डी. सी. जयपुर येथे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा ठसा उमटविला असून यापुढे कोकणात प्रथमच चिपळूणमध्ये सुसज्ज यंत्रणेसह सज्ज असणारे त्यांचे चिपळूणमधील वैद्यकीय दालन अनेक रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.
विखारे परिवारातील तिसरी पिढी डॉ. वेद विखारे यांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या या नूतन व्यवसायास चिपळूणकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.