देशभरात स्वच्छता अभियान चालू असताना संगमेश्वर रेल्वे स्थानकात गटाचे पाणी तुंबल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित..
संगमेश्वर- मकरंद सुर्वे संगमेश्वर प्रतिनिधी संगमेश्वर रेल्वे स्थानकात गटाराचे पाणी घुसून साठल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रोहा पनवेल या दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाले त्यावेळी संगमेश्वर रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी प्रवाशांची झाल्यामुळे तसाच मुसळधार पाऊस या पावसामुळे रेल्वे स्थान कात गळती होत हो ती तसेच कचरा पा ला पाचोळा कचरा साफसफाई न केल्याने गटाराची पाणी तुंबल्याने पाणी रेल्वे स्थानकात घुसून त्याचे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.
लोक प्रवाशा आपल्या बॅगा सामान उठवण्यात मोठी गडबड उडाली .त्यावेळी महिला व पुरुष आभार विरुद्ध अशा लोकांना अक्षरश धावपळ उडाली त्यावेळी संगमेश्वर चे स्टेशन मास्तर मास्टर यांना स्थानकात पाणी गटाराचे पाणी घुसत आहे. असे सांगितले प्रवाशांनी तेव्हा त्याने पावसाचे पाणी आहे. आम्ही काय करणार असे उत्तर देण्यात आले .
.तसेच आजवर डेंगू मलेरिया अशा बऱ्याच आजारांचे थैमान असताना अशावेळी गांधीजींच्या स्वच्छ भारत असे अधिकारी कसे सुधारणार यावर प्रश्नचिन्हच आहे अक्षरशः प्रवासी हतबल झाले. दररोज स्टेशनवर साफसफाई नसते. टॉयलेट मध्ये दररोज फिनेल किंवा इतर सामानाचा वापर केल्याचे दिसून येत नाही असे प्रवाशांकडून वारंवार सांगण्यात येते. संगमेश्वर रेल्वे स्थानकाचा गजब कारभार असल्याचे प्रवासी बोलत असल्याचे दिसून आले.
देशभर एक तास, एक दिवस, स्वच्छता अभियान माननीय पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असताना एक तारखेलाच सदरचा प्रकार झाल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्टेशन मास्तर याचा उद्धमपणाही वारंवार प्रवाशांना दिसून येतो. जिल्हाधिकारणे सदर विषयांमध्ये जातीनिशी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे मागणी प्रवाशांनी केली आहे.
https://fb.watch/nq2CgKr4xq/?mibextid=ZbWKwL
खालील छायाचित्रात संगमेश्वर रोड या स्थानकात गटाराचे पाणी पुसल्याने लोकांची तारांबळ दिसत आहे तसेच रेल्वे स्थानकात अक्षरशः गळती चालू आहे . सदर विषयावरती योग्य ती कारवाई रेल्वे प्रशासनाने करणे फार गरजेचे असून स्टेशनची साफसफाई मध्ये योग्य तो लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घालावे असे मागणी प्रवाशांचे आहे.