दापोलीत ढगफुटीसदृश पाऊस

Spread the love

दापोली :- तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे . मात्र , रविवारी तालुक्यातील किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले . केळशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने संपूर्ण केळशी गाव जलमय झाले आहे . घरांमध्ये शनिवारी रात्रीपासूनच पाणी शिरू लागल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली .
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला . त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तालुक्यात शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली . मात्र , रविवारी पावसाचा जोर किनारपट्टी भागात वाढला होता . किनारपट्टी भागातील आंबर्ले , केळशी ,वेळास , बाणकोटपर्यंत पावसाचा जोर कायम होता . तालुक्यातील केळशी गावात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने दाणादाण उडाली . केळशी गावातील नवानगर व कुंभारवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page