
रत्नागिरी- महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दिनांक ३०/१०/२०२४ रोजी च्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय कार्यालयासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, हमीपत्र किंवा शासनाच्या विविध कामासाठी बॉंण्ड पेपर वर करण्यात येणारे सर्व प्रतिज्ञापत्र हे साध्या कागदावर करण्याचे निर्देश करण्यात आले .मात्र या निर्देशची अंमलबजावणी स्थानिक सेतू कार्यालयात होत नव्हती. अशा अनेक तक्रारी मूळे ही बाब शिवसेना शिंदे गटाच्या निदर्शनात आल्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुका प्रमुख बाबू शेठ म्हाप, शिवसेना नेते सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शना खाली अप्पर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांची भेट घेऊन सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मांगणी केली.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक सेतू केंद्र मध्ये फ्लेक्स बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी व जनजागृती करण्यात यावी अशी सूचना करण्यात आल्या. या संदर्भात आपण तात्काळ कार्यवाहीचे आदेश देवू तसेच ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्यावर लेखी आदेश संबंधीतांना देवू असे अप्पर जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले .
याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष श्री आबा घोसाळे, विभाग प्रमुख शंकर झोरे, उपविभाग प्रमुख श्री बाबा हळदणकर, उप तालुका प्रमुख श्री राजू साळवी, विभाग प्रमुख श्री स्वप्निल ऊर्फ तारक मयेकर, उपविभाग प्रमुख श्री भिकाजी गावडे, मिरजोळे विभाग संघटक मजगांव सरपंच श्री फैयाज मुकादम, पावस विभाग प्रमुख श्री विजय चव्हाण, गोळप विभाग प्रमुख श्री नंदा मुरकर, विशेष कार्यकारी अधिकारी श्री सिध्देश शिवलकर, माजी सरपंच श्री जितेंद्र शिरसेकर, विभाग प्रमुख श्री प्रवीण पवार, विभाग प्रमुख श्री प्रविण पांचाळ, निवेंडी सरपंच सौ रवीना कदम, खरवते श्री संजय सकपाळ, दांडेआडम सरपंच श्री कैलास तांबे, चांदेराई सरपंच श्री योगेश दळी, जांभरुण सरपंच श्री गौतम सावंत, गणपतीपुळे सरपंच सौ कल्पना पक्ये, पिरदवणे सरपंच श्री श्रीकांत मांडवकर, ओरी सरपंच स्वाती देसाई, केळये सरपंच सौ सौरभी पवार, हरचेरी सरपंच श्री दत्ताराम येरीम, श्री प्रितम उर्फ मुन्ना घोसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते..