
राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट सोसाट्याचा वारा व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलपुर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत असे असेल हवामान ..
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून सायंकाळच्या वेळी किंवा रात्री मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे.
नैऋत्य मौसमी पावसाने आज उत्तर बंगालच्या उपसागरातून माघार घेतली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा व महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून पाऊस परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यापुढे दोन दिवसात भारताच्या उर्वरित भागातून सुद्धा पाऊस परतण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण द्वीकल्प दक्षिण व मध्यबंगाच्या उपसागरावर पूर्व तसेच ईशान्य कडून येणारे वाऱ्यांमुळे ईशान्य मोसमी पाऊस सुरुवात होण्याची शक्यता आहे. एक कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरावर स्थिर आहे व ते उद्यापर्यंत सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य अरबी समुद्रात आहे. त्यामुळे कोकण गोव्यात बरेच ठिकाणी तर पुढील चार-पाच दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी तर पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ..
मध्य महाराष्ट्रात आज नाशिक पुणे नगर जिल्ह्यात व उद्या बरेच जिल्ह्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्व जिल्ह्यामध्ये तर उद्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व ताशी ३० ते ४० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये १७ व १८ ऑक्टोबरला मेघगर्जना व विजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस काश अंशतः ढगाळ राहून संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.