मी कोकणी उद्योजक पुरस्कार… वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चा गौरव..

Spread the love

▪️मुंबई : शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा ‘मी कोकणी उद्योजक’ आज मुंबईतील चर्नी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला.

▪️या सोहळ्यात वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चा गौरव करण्यात आला.

▪️वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी हा सन्मान स्वीकारला. .

▪️यावेळी कोकणातील इतर उद्योजकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष युयूत्सु आर्ते, राष्ट्रपती पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे, आंतरराष्ट्रीय आर्थिक सल्लागार, दिलीप देशमुख, जॅकफ्रूट ऑफ इंडियाचे मिथिलेश देसाई, अन्नपूर्णा इंडस्ट्रीचे शामल पवार, अर्णव कॅफेचे जयवंत करंडे, राज डेकोरेटर्सचे विजय कुवळेकर, के. के. ग्रुप ऑफ कंपनीचे कल्पेश शीतप, वृषाली क्रिएशनचे दिलीप पातेरे, आदित्य रिअल इस्टेटचे जयेश गोमाणे, अजरामर कोकम सरबतचे जयंता ऊर्फ भाऊ सरदेसाई, सुनील सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेसचे सुनील गेले, संजय ओकटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, शिवसेना (उबाठा) संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष थेराडे, कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर, शिवसेना (उबाठा) कडवई उपविभागप्रमुख अरविंद जाधव, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती छोट्या गवाणकर, युवासेनाचे मुन्ना थरवळ, देवरुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, शिवणेचे पोलिस पाटील मनोज शिंदे, संगमेश्वरचे रेल्वे मॅन आणि पत्रकार संदेश झिमण, चिपळूण तालुका राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष राधा शिंदे, राष्ट्रवादीचे देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, राकेश दाते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, तालुका खजिनदार शमून घारे, रुपेश आवले, फैसल पिलपिले, मोहन वनकर, यांच्यासह शिवभक्त कोकण व निलक्रिएटरचे पदाधिकारी, प्रशांत यादव यांचे हितचिंतक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page