सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद…

Spread the love

रत्नागिरी : जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या आवारातील अनधिकृत बांधकाम, ड्रग्स, लव्ह जिहाद या अशी विविध महत्वाच्या विषयावर निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोर्चासाठी उपस्थित काजलं हिंदुस्थानी यांनी हिंदू समाजाच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

रविवारी उशिरा पोलिसांकडून परवानगी घेऊन सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा सोमवारी रत्नागिरीत निघाला. मारुती मंदिर येथील शिव तीर्थवरून हा मोर्चा निघाला. त्याची सांगता जयस्तंभ येथे झाली. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काजल हिंदुस्थानी यांनी जय्स्थंभ येथे उपस्थितांना उद्देशून भाषण केले. येवेली माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह चंद्रकांत राऊळ, संतोष पावरी, राकेश नलावडे, सतेज नलावडे, योगेश हळदवणेकर, नंदू चव्हाण, यांच्यासह विविध ठिकाणाहून हिंदू बांधव उपस्थित होते.

मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकरी एम देनेन्द्र सिंग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी यांनी यावेळी हिंदू बांधवाचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मागण्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

येत्या ४ मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमुक्त रत्नागिरी, भूमी अतिक्रमण, लव्ह जिहादमुक्त रत्नागिरी चलो रत्नागिरी चलो रत्नागिरी असा नारा या वेळी देण्यात आला. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ, मारुती मंदिर येथून चालू होणार आहे. जयस्तंभ येथे प्रमुख वक्त्या काजल हिंदुस्थानी मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन समारोप होईल. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरीत शासकीय ग्रंथालयाच्या जागेत असणारे अनधिकृत बांधकाम जिल्हधिकाऱ्यांनी पाडण्याचे आदेश दिले असताना प्रशासन टाळाटाळ का करते? राजापूर पन्हळे येथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. शिरगांव, आडी येथेही भूमी अतिक्रमण सुरू आहे. रत्नदुर्ग किल्ल्यावर रेखांकन करून सरकारी भूमीवर अतिक्रमण केले आहे. हिंदूंच्या जमिनी बळकावणारे विभागिय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते, याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आलेल आहे. या मोर्चात सर्व हिंदू बांधवानी, माता, भगिनींनी आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजुन बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page