पुणे- राज्यात काही जिल्हे वगळता जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज व पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना सांगली कोल्हापूर जिल्हा वगळता तर उद्या मुंबई,पालघर, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी प्रतीतास वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम असून पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्र छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेशची किनारपट्टी वायव्य बंगालचा उपसागराच्या आणखी काही भागात पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्याचा काही भाग पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या उर्वरित पर्वतरांगाचया उर्वरित काही भागात तर बिहारच्या काही भागात वाटचाल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. राज्यात आज रविवारी तर पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना सांगली कोल्हापूर जिल्हा वगळता तर उद्या मुंबई, पालघर, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी प्रतीतास वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर १७, १८, १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच १७ जून रोजी नांदेड वगळता संपूर्ण मराठवाडा आणि अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेगगर्जणा व ताशी ४० ते ५० किमी वेगाने प्रारीतास वेगाने वादळी वारे वाहण्याची व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग तर १९ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.