आरोग्य मंत्र- “तरूणपणीच म्हातारपण आणतात या सवयी, आजारांचं घर बनतं शरीर…..”

Spread the love

लोकांना आयुष्य जास्त जगायचं असतं, पण त्यासाठी आपल्या खराब सवयी सोडणं त्यांना जमत नाही. अशा अनेक सवयी असतात ज्या सामान्यपणे लोकांमध्ये बघायला मिळतात. या सवयी फार नुकसानकारक असतात तरीही लोक त्याची चिंता करत नाहीत. याच कारणाने लोक कमी वयातच वृद्ध दिसू लागतात. अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊन आपला जीवही गमावतात.

तुम्हीही तुमच्या या सवयी सोडून चांगलं जगण्याचा विचार करा…

झोप कमी घेणं…

आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांची झोप उडाली आहे. बरेच लोक असे आहेत जे ना वेळेवर झोपू शकतात ना वेळेवर उठू शकतात. सुरवातीला कमी झोप घेतल्याने इतकी काही समस्या होत नाही, पण काही दिवसाने समस्या सुरू होतात. शरीराला आरामाची गरज असते, जी झोपेच्या माध्यमातून पूर्ण होते. त्यामुळे दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घ्यावी.

केमिकल फ्री आणि प्रोसेस्ड फूड…

फिट आणि निरोगी रहायचं असेल केमिकल फ्री आणि प्रोसेस्ड फूडचा समावेश असावा. आजकाल बाजारात मिळणारे प्रॉडक्ट्स फार नुकसानकारक असतात. जर स्वत:ला तरूण ठेवायचं असेल तर चांगलं खाणंपिणंही गरजेचं आहे. डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. जास्त मांस खाऊ नका. तसेच जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणंही टाळावं.

रोज फिजिकल अॅक्टिविटी करणं…

जर तुम्ही आळस करून कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर ही सवय तुमच्यासाठी अजिबात चांगली नाही. जर तुम्ही रोज एक्सरसाइज किंवा फिजिकल अॅक्टिविटी केली तर अनेक गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. सोबतच तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे रोज एक्सरसाइज आणि मेडिटेशन करा.

दारू आणि सिगारेटचं सेवन…


आजकाल दारू आणि सिगारेटचं सेवन कॉमन झालं आहे. पण ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त नुकसानकारक आहे. जर तुम्ही जास्त काळ दारू आणि सिगारेटचं सेवन केलं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page