महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा ४था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा.

Spread the love

महाराष्ट्र संरक्षण संघटना गेल्या चार वर्षांपासून मराठी भाषा  जतनसंवर्धनसंरक्ष मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १४ जाने.रोजी बोरीवली पुर्व येथे महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा ४ था वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. 

ह्या वर्धापन दिन निमित्त संघटनेचे प्रमुख उपस्थितमान्यवर माजीभाषा संचालक श्री. परशुराम पाटील साहेब, नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परब साहेब, अध्यक्ष श्री धर्मेंद्र घाग, श्री.अमर कदम,श्री. रविंद्र कुवेसकर, सौ. दिप्ती वालावलकर  प्रगती भोसले हे मंचावर उपस्थित  होते.

श्री.परशुराम पाटील,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष दिप्ती वालावलकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासेहब आंबेडकर ह्यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचे संघटनेकडूनपुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात  आले.मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष  श्री. दिलीप घाग सौ. द्रुष्टी घाग त्यांनी संघटनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
 तसेच पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.  संघटनेचे पदाधिकारी श्री रविंद्र कुवेसकर ह्यांनी संघटनेचा सुरु  झालेला प्रवास आणि आता पर्यंतची वाटचाल याबाबत चर्चा केली.

परशुराम पाटील साहेब, श्री. रविंद्र परब, दिप्ती वालावलकर, प्रगती भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करून संघटनेला मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रमोद मसुरकर ह्यांनी 
देखील आपले मनोगत व्यक्त करून मराठीभाषेबद्दल चे महत्व पटवून संघटनेला मार्गदर्शन केले. संघटनेनें आत्ता पर्यंत केलेल्या कार्याचा  अहवाल श्री संदेश जाधव ह्यांनी सदर केला.संघटनेच्या  माध्यमातून मुख्य पदावर नवनियुक्ती पदाधिकारी रविंद्र शिंदे, राजेश मुलुख, श्रीकांत शिंदे, उदय जागुष्टे, अजय कोयंडे, अनिल हातेकरयांची नियुक्ती करण्यात आली. 


तसेच विभागीय पदाधिकारी म्हणून अक्षय पिंदळकर आणि इतरनवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष  श्री. धर्मेंद्र घाग  यांनी मराठी भाषा, प्रचार आणि प्रसार तसेच मराठी भाषे बद्दल 
अस्मिता लोकांच्या मनात कशी जागृत करावी. विभागावर जनजागृतीकरून कशाप्रकारे संघटना वाढवता येईल ह्या बद्दल संघटनेतील पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले. तसेच १४ जानेवारी ते २८ जानेवारी रोजी शासनाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा कशा प्रकारे मराठी भाषा पंधरवडा साजरा करावा ह्या बद्दल एक संघटनकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
 

जाहीरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page