इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात इस्रायलनं मोठी कारवाई केली आहे. हमासचा म्होरक्या इस्माइल हनीयेह याला ठार करण्यात आलं आहे. इस्रायल सैन्य दलानं इस्माइल हनीयेह याच्या घरावर केलेल्या हल्ल्यात त्याचा खात्मा करण्यात आला आहे.
*तेहरान-* इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या तथा राजकीय ब्युरो चिफ इस्माइल हनीयेह याला ठार करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं बुधवारी प्रसार माध्यमांना दिली आहे. इस्माईल हनीयेह आणि त्याच्या एका अंगरक्षकाला तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार करण्यात आलं.
*हमासचा म्होरक्या टिपण्यास इस्रायलला यश-*
तेहरान इथल्या निवासस्थानात हमासचा म्होरक्या इस्माइल हनीयेहला टिपण्यात इस्रायलच्या सैन्याला यश आलं. इस्रायलच्या सैन्यानं तेहरान इथल्या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्यात इस्माइल हनीयेह याचा खात्मा करण्यात आला. त्यामुळे इराणध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इस्माइल हनीयेह आणि त्याचा अंगरक्षक मारल्या गेल्याचं वृत्त इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या संघटनेनं प्रसार माध्यमांना दिलं.
*इस्माइल हनीयेह यानं वरिष्ठ नेत्यांशी भेटल्याचे फोटो सोशल माध्यमात-*
हमासचा म्होरक्या इस्माइल हनीयेहच्या घरात घुसून इस्रायलच्या सैन्यानं त्याचा खात्मा केला. याबाबतचं वृत्त पसरताच इस्माइल हनीयेहच्या निवासस्थानी शोक व्यक्त करण्यात आला. मात्र इस्माइल हनीयेह यानं इराणचे वरिष्ठ नेते सय्यद अली होसेनी खमेनी यांच्याशी भेट घेतली. सय्यद अली होसेनी खमेनी यांनी इस्माइल हनीयेहसोबतची फोटो सोशल माध्यमात शेयर केले. मात्र त्यानंतर इस्माइल हनीयेह याला इस्रायलच्या सैन्यानं घरात घुसून ठोकलं आहे.
*इस्रायल संरक्षण दलांनी फोटोवर केली जोरदार कमेंट :*
इराणचे वरिष्ठ नेते सय्यद अली होसेनी खमेनी यांनी हमासचा म्होरक्या इस्माइल हनीयेह याची भेट घेतल्यानंतर सोशल माध्यमात भेटीचे फोटो शेयर केले. मात्र इस्रायलच्या संरक्षण दलानं या फोटोवर मोठी खोचक टीका केली. इस्रायल संरक्षण दलानं केलेल्या कमेंटमध्ये नमूद केलं आहे की, कोणी इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी नेत्यांचे फोटो अॅप बनवलं आहे काय ? इस्रायलच्या संरक्षण दलानं केलेल्या या खोचक कमेंटनंतर ही बाब जगभर पसरली. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी कतारमध्ये राहणारा इस्माइल हनीयेह तेहरानमध्ये होता. याच वेळी इस्रायलच्या सैन्यानं त्याचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.