हमासचा इस्रायलवर हल्ला; तेल अवीववर डागली क्षेपणास्रे; इस्रायलने केल्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द….

Spread the love

*जेरूसलेम-* इस्रायलचे गाझापट्टीत युद्ध सुरु असतानाच पुन्हा एकदा हमासने डोके वर काढले आहे. हमासने तेल अवीववर क्षेपणास्रे डागल्यानंतर मोठे स्फोट झाले आहेत. त्यामुळे युद्धाची ठिणगी उडाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कस्साम ब्रिगेडने घेतली आहे.हमासच्या अस-कस्साम ब्रिगडने तेल अविव आणि उपनगरांवर दोन क्षेपणास्र डागली आहेत.

तेल अवीव हे इस्रायलचे व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने इस्रायल आता या हल्ल्याचा कसा बदला घेणार आणि त्यातच इराण देखील बदल्याने पेटल्याने या क्षेत्रात मोठ्या युद्धाचा भडका उडणार आहे. इस्रायलचे आर्थिक केंद्र असलेल्या तेल अवीवला हमासने टार्गेट केले आहे. आम्ही तेल अवीववर दोन रॉकेट डागले आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकल्याचे हमासने म्हटले आहे. हमासची सैनिकी शाखा अल-कस्साम ब्रिगेडने तेल अवीव आणि आजूबाजूच्या उपनगरांवर टार्गेट करीत एम 90 क्षेपणास्र डागली असल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे.

हमासने अनेक महिन्यानंतर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने एक रॉकेट तेल अवीव जवळच्या समुद्रात पडल्याचे म्हटले आहे. इस्रायलने त्यांच्या रजेवर गेलेल्या सर्व सैनिकांना तातडीने ड्यूटीवर जॉइंट होण्याचे आदेश दिले आहेत. इराण बदला घेणार असल्याची कुणकुण लागलेल्या इस्रायलने आता आपल्या सैनिकांना तातडीने अझरबैझान आणि जॉर्जिया सोडण्याचा आदेश दिला आहे. इस्रायली सैन्याने इराणला इशारा देताना आम्ही आमच्या शत्रूच्या घोषणा आणि आव्हानाला गंभीरतेने घेतो असे म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page