पोलीस उप-निरीक्षकास ५ हजारांचा हप्ता देणाऱ्या गुटखा तस्करास बेड्या

Spread the love

मीरारोड – गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात आरोपी करू नये या साठी तसेच गुटखा पुरवठ्याचा व्यवसाय चालू देण्यासाठी एका पोलीस उप-निरीक्षकाला ५ हजारांचा हप्ता नक्की करणाऱ्या गुटखा तस्करास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विशेष म्हणजे आधी देखील एका पोलिसाला नियमित ५ हजार हप्ता देत असल्याची कबुली गुटखा तस्कराने दिली आहे .

 

नवघर – नया नगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने -पाटील यांच्या कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक आकाश इरले हे कार्यरत आहेत . गुटखा विक्री प्रकरणात डिसेम्बर मध्ये पानटपरी वाल्यांवर नवघर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत . त्या गुन्ह्यातील अटक आरोपीना गुटखा पुरवठा करणारा  सुरेंद्र रामपलट चौरसिया रा .नर्मदा नगर , भाईंदर पूर्व हा आकाश यांना सातत्याने कॉल करून भेटायचे आहे म्हणून सांगत होता . 

दिवशी चौरसिया हा आकाश यांना भेटला . तेव्हा त्याने आपण भाईंदर पूर्वेच्या विविध भागात गुटखा – पानमसाला पुरवत असल्याचे सांगून पूर्वीचे रमाकांत साहेब हे सुद्धा दरमहा ५ हजार हप्ता घेत असल्याचे चौरसिया याने सांगितले.

चौरसिया हा पोलिसाला लाच देत असल्याची खात्री पटल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकम विभागाच्या उपअधीक्षक माधवी राजेकुंभार सह   खान, बजागे, तेटांबे यांच्या पथकाने सापळा रचला . गुरुवारी सायंकाळी चौरसिया ह्याने जेसलपार्क येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ५ हजार रुपये आकाश यांच्या टेबलावर देण्यास ठेवले . त्यावेळी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी चौरसिया ह्याला अटक केली . नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा चौरसिया वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात चौरसिया याने नाव घेतलेल्या रमाकांत सह अनेक पोलिसांची गुटखा मधील हप्तेबाजी उघडकीस येण्याची शक्यता आहे . 

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page