रत्नागिरी : रेल्वे गाड्यांचे पूर्वीचे पारंपरिक रेक बदलून त्या जागी नवे एल.एच.बी कोच जोडून गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वे आखले आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्ग धावणारी आणखी एक गाडी आता एल.एच.बी श्रेणीतील धावणार आहे. गोव्यातील वास्को द गामा ते पटना दरम्यान ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 12741/12742 ती साप्ताहिक विशेष गाडी पारंपरिक रेकसह धावत होती. ती आता नव्या एल.एच.बी रेकसह धावणार आहे.
वास्को ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एल.एच.बी श्रेणीतील चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती एल.एच.बी श्रेणीतील झाल्यानंतर ती 21 डब्यांची धावणार आहे.
जाहिरात