प्रतिनिधी – विनोद चव्हाण
कोकण विभाग मध्ये प्राथमिक आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण मूलभूत सेवासुविधा काम करणारी मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा – राजापूर ही सामाजिक संस्था मागिल सात वर्षांपासून काम करीत आहे, या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महारक्तदान शिबीर लांजा येथे आयोजित करण्यात आले. मनुष्यास उपयुक्त रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते ते कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही आणि म्हणूनच “रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान!” म्हणून मानले जाते असे संस्थे अध्यक्ष सुभाष तांबेचर्चा करताना म्हणाले.
ग्रामीण स्तरावर “आरोग्य” ही बाब अतिसंवेदशील असून संस्थेच्यावतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधत दरवर्षी ग्रामीण स्तरावर ‘आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर’ उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे यावेळी लांजा येथे ग्रामीण टीमच्या सहकार्याने “श्री. स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटल, लांजा” याठिकाणी ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत सकाळी ०९ ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबीर” आयोजन करण्यात आले. या मध्ये ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करताना पुरुषांबरोबर महिला रक्तदात्या देखील सहभागी होत्या हे या शिबिराचे विशेष होते. रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय टीम रत्नागिरी सहयोगातून रक्तसंकलन केले असून शिबीर यशस्वी करण्यासाठी मान. डॉ. श्री. सुहास खानविलकर (श्री. स्वामी समर्थ हॉस्पिटल, लांजा) यांचे विशेष सहकार्य लाभले. अनेक हितचिंतनकांच्या दातृत्वाने आणि आशीर्वादाने सदर शिबीर सुनियोजनात पार पडले.
जिल्हा मध्ये रक्तपेढीत रक्त पिशव्यांची कमतरता असल्याची नेहमीचीच सर्वसाधार व्यक्तीला समस्याला सामोरे जावे लागते. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील ग्रा. रुग्णालये सह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्तपिशव्यांची कमतरता भासत असते. रस्ते – महामार्गावरील वाढलेले अपघात तसेच ग्रामीण भागातील स्थानकांवरील उपचारांभावी अनेक वेळा रक्तसाठ्यांभावी मृत्यूला समोर जावेलागते. ही जनसामान्यांची गरज लक्षात घेऊन एमपीव्हीएस या सामाजिक संस्थेने मागील सहा वर्षे पुढाकार घेत प्रतिवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करीत समाजऋणाचे कार्य करीत असे मत संस्थेचे सचिव अजय मांडवकर यांनी व्यक्त केले.
रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय रत्नागिरी रक्तपेढी टीम, लांजा नगराध्यक्ष श्री. मनोहर बाईत साहेब, नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये, डॉ. सुहास खानविलकर, शिवसेना (शिंदे गट) लांजा तालुका प्रमुख श्री गुरुप्रसाद देसाई , विलवडे रिक्षा चालक संघटना पदाधिकारी, खरवते सरपंच श्री. अभय चौगुले, कळसवली सरपंच, देवेश तळेकर, चुनाकोळवण सरपंच श्रीकांत मटकर आदी मान्यवरांनी शिबिरात उपस्थिती दर्शविली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषजी तांबे, उपाध्यक्ष (ग्रामीण विभाग) गणेश खानविलकर, उपाध्यक्ष – सुजयजी गितये, सल्लागार श्री. रविंद्र मटकर, माजी अध्यक्ष – विजय भगते, माजी कार्याध्यक्ष, पाठपुरावा विभाग प्रमुख – अमोल पळसमकर, उपखजिनदार, आयटी प्रमुख – स्वप्नील मिरजोळकर, सभासद संघटन प्रमुख – तानाजी तळेकर, सांस्कृतिक प्रमुख – कल्पेश म्हादये, लांजा तालुका प्रमुख – रविंद्र कांबळे, राजापूर तालुका प्रमुख, सरपंच श्रीकांत मटकर, सहल प्रमुख/ब्लॉगर समन्वयक – किरण भालेकर, ग्रामीण संघटक – श्रीधर पाटील, तुकाराम मिरजोळकर, मंगेश बापर्डेकर, विलास आग्रे, सत्यवान रामाणे, निलेश कांबळी, शैलेश गुरव, सुनील मौर्ये, रुपेश हातणकर, महेंद्र हातणकर, माजी आरोग्य संघटक, महिला सदस्या सौ संचिता खानविलकर आणि दीप्ती शेडेकर आदी मुंबई / ग्रामीण पदाधिकारी आणि सदस्य-सदस्या सदर “रक्तदान शिबीर” उपस्थित होते. व्यासपीठावरीळ स्वागत आणि सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजय गितये आणि दिनेश झोरे यांनी केले.