राजापूर | प्रतिनिधी : गतवर्षीचा कमी पडलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात कोकण पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळत असतानाच फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे.
सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे हा प्रश्न तमाम कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आज 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे.
मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे फुल भरले आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे.आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे.
ऐन शिमगोत्सवात राजापूरची गंगा अवतरली,भाविकांची प्रचंड गर्दी..
कोकणात राजापुर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेली गंगामाई पुन्हा ऐन शिमगोत्सवात अवतली असून याठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. गंगेचे आगमन पुन्हा ४ महिन्यांनी झाले आहे. सध्या कोकणात कडक उन्हाळा सुरु झाला असून पाण्याचा प्रवाह गंगेतून वाहत आहे, या चत्मकाराला पाहण्यासाठी भाविकांची रांग लागली आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी पडला तरीही फाल्गुन पोर्णिमेला गंगेचे अवतरण झाले आहे. सर्वत्र भीषण पाणी टंचाई आहे आणि उन्हाळे येथील प्रसिध्द गंगामाईचे आगमन झाले आहे. गंगेचा प्रवाह प्रवाहित झालेला पाहून लोकांच्या चेहर्यावर आनंद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे १४ कुंडे भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात हा चैतन्याचा प्रवाह वाहताना पाहून भाविकांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा वाहू लागली ही वार्ता चोहीकडे पसरली आहे.